नवीन लेखन...

तुमचे कौटुंबिक, सामाजिक संबंध कसे सुधाराल

आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच आणि त्यामुळे ह्या गोष्टी माहित असणं अधिक गरजेच आहे.

खाली तुम्हाला काही मुलभूत गोष्टी सुचविलेल्या आहेत ज्याचा तुम्हांला इतरांशी संबंध सुधारण्यात किंवा अधिक दृढ करण्यास उपयोग होऊ शकतो.

१ लक्षपूर्वक ऐकण

“जितकं तुम्ही जास्त ऐकाल.” – अॅलेक्झांडर सोल्शेनित्सेन

“मला ऐकायला आवडतं. ऐकण्यामुळे मी खुप शिकलो

बरेच जण ऐकतच नाहीत.” – अरनेस्ट हेमिंग्वे

आपल्याला बोलण्याची फार आवड असते. जेव्हा आपण दुसऱ्याचं बोलणे ऐकत असतो, त्यावेळेस त्यांच बोलणे कधी संपतय आणि मी माझं मत कधी मांडतोय असं हो तंत्र एक तर आपण त्या व्यक्ती बरोबर सहमत होता अथवा असहमती दर्शवतो. कधी कधी भावनिक देखील होतो. आपण ऐकण्या ऐवजी आपल्या मर्यादीत बुद्धीने आकलन करण्याचा प्रयत्न करतो. याचा परिणाम म्हणजे समोरच्याला वाटतं आपण त्याला समजून घेत नाही.

नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याच हे एक प्रमुख कारण आहे. यावर मात कशी करावी?

एक उपाय म्हणजे आपल्या मनातील विचार थांबवून त्या व्यक्तीच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करणे. त्या व्यक्तीच्या बोलण्याचा स्वतः अर्थ लावण्याऐवजी प्रश्न विचारून तो स्पष्ट करून घेणे.

यामुळे समोरच्याला आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याच समाधान मिळेल.

२ समोरच्या व्यक्तीमध्ये रस घ्या:

जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये रस घेता, तेव्हा तुम्ही आपोआपच चांगले श्रोते होतात कारण तुम्ही त्यांच्या मनात काय चाललय याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करता. यामुळे नाती सुधारण्यास आणि नवीन नाती निर्माण करण्यास विशेष मदत होते.

३ दोषारोपणाला जास्त महत्त्व देऊ नका.

दोषारोपण लक्षपूर्वक ऐका जर तुम्हांला त्यात तथ्य वाटत असेल तर त्यात बदल करा. पण बऱ्याच वेळा काही टिका निरूपयोगी आणि अवास्तव असतात कारण एखादी व्यक्ती जेव्हा टिका करते तेव्हा त्यामागे तुमची काही चुक असतेच अस नाही. काही वेळेस त्या व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसते म्हणून तो काहीतरी बरळतो.

४ निरर्थक बडबड करू नका

“जितकं तुम्ही जास्त बोलता, लोकांच्या तितकं कमी लक्षात राहत” जितकं तुम्ही जास्त बोलता, तेवढं समोरच्या व्यक्तीचं ऐकण्यासाठी कमी वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहते. पण ज्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीत बोलण्याची संधी देता तेव्हा समजून घेण्याची प्रक्रिया ही जलद होते जी आपल्याला आपलं बोलणं कमी शब्दात व वेळेत बोलण्यास मदत करते.

५ ज्याप्रमाणे इतरांनी तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे त्यांच्याशी वागा.

‘क्रिया-प्रतिक्रियेचा’ नियम माणसांच्या बाबतीतदेखील लागू पडतो. जसं तुम्ही इतरांशी वागता बऱ्याच वेळेस समोरच्यालाही तुमच्याबरोबर तसं वागावसं वाटतं, आज नाहीतर उद्यातरी पण काही काळात हे खरं ठरू लागतं.

तुमची विचारसरणी तुमच्या नातेसंबंधांवर, बोलण्यावर प्रभाव टाकतं. तुमचे विचार आणि भावना तुम्ही कसे बोलता, तुमची देहबोली यावर प्रभाव टाकतं. त्यामुळेच तुम्ही जर नुसते चांगले शब्द बोलत असला तर समोरच्याला त्यातील फोलपणा लक्षात येऊ शकतो. ‘शब्दांना’ संभाषणात केवळ ७ महत्त्व आहे.

६ सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

जर तुमच्या विचारसरणीला इतकं महत्त्व असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक बाजू असते. आपण तिचा जागरूकपणे शोध घेतला पाहिजे.

जेव्हा आपला दृष्टीकोन सकारात्मक असतो तेव्हा अडचणीतही आपल्याला संधी दिसू लागतात. प्रत्येक अपयशात यशाकडे नेणारी एक शिकवण दिसते. ‘सकारात्मकता’ हा एक स्वभावगुण आहे जो सरावाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊ शकतो.

७ मौन पाळा.

मौन पाळण्यासाठी बरीच चांगली कारणे आहेत. तुमचं श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी याचा फार उपयोग होतो. यामुळे अनावश्यक वाद टाळता येऊ शकतात. दुसरे आपल्याकडून दुखावले जाण्याची शक्यता कमी होते. मौने पाळणे म्हणजे स्वतःच्या भावना दाबून ठेवणे नव्हे तर त्यांचा निचरा करणे. आपल्या भावनांकडे साक्षी भावाने पाहणे आणि नकारात्मक भावनांचा जाणीवपूर्वक त्याग करणे आणि हे फकत उत्त्तेजक परिस्थितीत मौन पाळण्याने शक्य होतं. जर तुम्ही शांती आणि सकारात्मकता अनुभवत असाल तर ती तुमच्या देहबोलीतून स्पष्ट होते. ज्याप्रमाणे देहबोलीवर मनातील विचारांचचा परिणाम होतो. तसाच उलट देहबोली सकारात्मक केल्यास त्याचा सकारात्म परीणाम देहबोलीवर होतो.

जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर बोलत असताना जाणीवपूर्वक डोळयात डोळे घालून बोलता तेव्हा त्याचा फायदा लक्षपूर्वक ऐकण्यासाठी होतो. तुमच्या देहबोलीत योग्य बदल करून समोरच्याच्या बोलण्यात रस घेऊ शकतो.

संकलन – अमोल सातपुते

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..