नवीन लेखन...

नेमकं वजन मोजायचं योग्य साधन कोणतं?

भाजीचं वजन करतांना भाजीवाला तराजू नावाचं जे साधन वापरतो, त्याने तो भाजीचं वजन मोजत नाही. तो फक्त मापाचं वजन आणि भाजीचं वजन यांची तुलना करतो. मग एखाद्या वस्तूचं वजन करायचं असेल तर काय करता येईल?

पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांची सुवर्णतुला होत असे. तेव्हा एका पारड्यात राजा बसत असे. दुसऱ्या पारड्यात राजाला तोलून धरण्याइतक्या वजनाची सोन्याची नाणी! पण या प्रकारात ना राजाचं वजन कळत असे ना सोन्याचं! आता मात्र सोनं तोलतांना वापरला जाणारा तराजू (तुला) काचेच्या बंद पेटीत असतो. हवेचा छोटासा हेलकावासुध्दा वजनाचं पारडं हलवू शकतो. आणि सोन्याच्या वजनात अगदी मिलिग्रॅमचा जरी फरक पडला तरी ग्राहक किंवा दुकानदार मोठ्या तोट्यात पडू शकतात. खरंतर, मुळात तराजू हे वजनाच्या तुलनेचं साधन असून वजन मोजण्याचं साधन नाही. त्यामुळे तराजूने केलेल्या वजनाबद्दल म्हणावी तशी खात्री देता येत नाही. मग वजन मोजण्याचं साधन कोणतं? प्रिंगतुला किंवा ताणकाटा !

आपण गादीवाल्याकडे ताणकाटा पाहिला असेल. ताणकाट्याच्या हकाला गादी अडकवली की प्रिंग ओढली जाते आणि त्या पट्टीवरचा काटा आपल्याला योग्य ते वजन दाखवतो. या साधनामध्ये वजनाची तुला होत नाही तर वजन मापलं जातं. आपण वजन करण्यासाठी वजनकाट्यावर उभे राहतो, त्यातही तरफा आणि प्रिंगचा वापर करुन वजन मापलं जातं, जे तुला करण्यापेक्षा जास्त योग्य असतं. रेल्वे स्टेशनवर मोठमोठ्या पार्सलांचं वजन मोजण्यासाठी वापरलं जाणारे एकच पारडे असलेले साधनही बरंचस योग्य वजन सांगतं.

सध्याचा सोन्याचा भाव लक्षात घेता, सोन्याचं वजन करतांना तर अत्यंत संवेदनक्षम असलेले डिजीटल तराजू वापरले जायला लागले आहेत. तेव्हा आपल्याला कोणत्या वस्तूचं वजन मोजायचं आणि त्यात किती नेमकेपणा हवाय, हे जाणणारी व्यक्ती, गरजेप्रमाणे योग्य तेच साधन वापरते. त्यासाठी आपण इंजिनियर नसलो तरी आपली उपजत इंजिनियरिंग स्कील्स वापरु शकतो.

— डॉ. मानसी राजाध्यक्ष

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..