नवीन लेखन...

औषधांची साठवण कशी करायची

औषधांची परिणामकारकता व सर्व गुणधर्म जपण्यासाठी त्यांची घरात योग्य ठिकाणी साठवण करणे आवश्यक असते.

सूर्यप्रकाश, उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे औषधांचे विघटन होऊन मुदतीआधीच ती निरुपयोगी होऊ शकतात. म्हणूनच खिडकीत, फ्रीजवर, टी. व्ही. वा ओव्हनवर, गॅसजवळ, किचन टेबलवर (चटणी, लोणच्यांच्या सोबत), बाथरूममध्ये, बेसीनजवळ अशा ठिकाणी औषधे ठेवू नयेत. कोरड्या व थंड ठिकाणी औषधे ठेवणे उत्तम. शक्यतो घरातील सर्व औषधे एका ठिकाणी असावीत. गोळ्या, कॅप्सुल्स एखाद्या बंद डब्यात वा प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवता येतील. द्रव औषधांसाठी (लिक्विडस्) ट्रे वा बास्केट ठेवता येईल. शक्य असेल तर एक वेगळे छोटेसे कपाट वा कप्पा ‘मेडिसीन कॅबिनेट’ म्हणून केल्यास सर्व औषधे एका जागी राहतील. औषधांची सूची (नाव, उपयोग, मुदतीची तारीख) करून ठेवल्यास कोणती औषधे कोणत्या कारणाने वापरायची असतात याबाबत गोंधळ होणार नाही. विशेषतः कही औषधे कधीतरी क्वचितच लागतात, अशा औषधांबाबत ही सूची उपयुक्त ठरेल. घरात जर कायमस्वरूपी औषधे घेणाऱ्या व्यक्ती असतील (विशेषतः वृद्ध मंडळी) तर अशा प्रत्येकासाठी औषधांचा स्वतंत्र डबा ठेवल्यास उत्तम. औषधांची नावे, त्या घेण्याच्या वेळा याचा तक्ता बनवून डब्यावर लावल्यास वृद्धांना वा त्यांच्या ‘केअर टेकर’ना औषधे देताना सोयीचे होईल.
घरातील लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यापासून सर्व औषधे कायम दूरच ठेवली पाहिजे. अनेकदा खाऊच्या गोळ्या वाटून औषधाच्या गोळ्या लहान मुलांनी खाल्ल्याच्या घटना घडत असतात. आजकालची औषधे अधिकाधिक आकर्षक, रंगीत असल्याने हा धोका अधिक संभवतो. म्हणून लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत, अशा उंच वा बंद ठिकाणीच औषधे ठेवावीत.

काही औषधे ही फ्रीजमध्ये ठेवायची असतात. त्यावर ‘थंड ठिकाणी ठेवावे’ असे लिहिलेले असते. ही औषधे फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे) ठेवावीत व बाकी बहुतांशी औषधे आधी नमूद केल्याप्रमाणे कोरड्या, थंड व काळोख्या जागी-सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावीत. अशा प्रकारे औषधांना जपल्यास त्याची गुणकारकता कायम राहील.

डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..