[embedyt] https://www.youtube.com/watch?v=ovAaQY92YMU[/embedyt]
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यायाम करण्याचा सल्ला आवर्जून पाळला पाहिजे. मात्र, काही जण प्रचंड शारीरिक ऊर्जा गरजेची असलेल्या वैविध्यपूर्ण क्रीडाप्रकारांत सहभागी असतात. गरज नसताना अतिरिक्त व्यायामही करतात. या व्यायामप्रकारांत ऊर्जा, वेग, उंची यांसारखे घटक समाविष्ट असतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या हृदयाची काळजी घ्यायला हवी.
रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या’हृदयवेदनेची’ विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते.
एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते.
आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण स्वत:ला जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत रेटतो; परंतु आपले शरीर हे बदल कसे स्वीकारेल याची कल्पना नसल्यामुळे अनेकदा लोकांना आरोग्याच्या काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिरिक्त ताण देणाऱ्या व्यायामामुळे काही प्रसंगी हृदयाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
Sanket
Leave a Reply