भूकंपाच्या एक एक धक्क्याने
सारं जमीनदोस्त केलं |
पहाता पहाता त्या भेगांनी
होत्याच नव्हतं केलं ||१||
ज्वालामुखीच्या मुखातून
लाव्हा भळभळतअसताना |
प्रत्येक वस्तू खाक होत होती
त्याला अंगावर घेताना ||२||
हे सारं लोभस दिसत होतं
दुरुन पहाताना |
मीच माझा राहू शकलो नाही
हे अनुभवताना ||३||
म्हणून वाटतं या जगात
प्रत्येक माणसाला |
हृदय नावाची चिज तरी
हवी स्वत;चीच असायला ||४||
मग प्रत्येक जण सुखी असेल
सारं जग सुखी असेल |
अरे कुणीतरी जगा असे
हे सारं अनुभवायला ||५||
Leave a Reply