नवीन लेखन...

हम आपके है कौन

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी रिलीझ झाला. काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी ते ‘कालचे ‘ होत नाहीत. ते कायमच ‘आजचे ‘ राहतात.

राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘ या कौटुंबिक चित्रपटाबाबत अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी २७ वर्षे पूर्ण होत आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट ट्रेण्ड सेटर ठरला. या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या शहरातील एकमेव थिएटरमध्ये आकर्षक डेकोरेशनसह सिनेमा रिलीज करणे, त्यातच चित्रपटात वापरलेल्या वस्तूच्या प्रतिकृती विक्रीला ठेवणे, सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहण्याजोगे वातावरण निर्माण करणे अशा वैशिष्ट्यांसह हा चित्रपट प्रदर्शित झाला. लग्नाची व्हिडिओ कॅसेट असे म्हटले गेलेला हा चित्रपट देशविदेशात लोकप्रिय ठरला.

मुंबईत लिबर्टी थिएटरमध्ये या चित्रपटाने १०२ आठवड्यांचे यश संपादले. या चित्रपटात चौदा गाणी असल्याने त्याला काहीनी ‘छायागीत’ असेही म्हटले. पण यातील अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. लो चली मै, हम आपके है कौन, माई नि माई, मौसम का जादू, चॉकलेट लाईम ज्यूस, जुते दे दो पैसे दे दो, पहला पहला प्यार है, धिकताना धिकताना, मुझसे जुदा होकर, वाह वाह रामजी ही गाणी लाऊडस्पीकरपासून आजच्या यु ट्यूब चॅनलपर हिट आहेत.

लता मंगेशकर तसेच एस. पी. बालसुब्रम्हणम, उदीत नारायण, शैलेंद्र सिंग, कुमार शानू इत्यादीनी ही गाणी गायली आहेत. ही गीते देव कोहली आणि रवींद्र रावल यांची असून संगीत राम लक्ष्मण यांचे आहे. या चित्रपटात मोहनिश बहेल, बिंदू, सतिश शहा, दिलीप जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोकनाथ, प्रिया अरुण, अनुपम खेर इत्यादींच्याही भूमिका आहेत. गीत संगीत व नृत्य यातून ही पटकथा घडते, एक प्रकारचा हा वेगळा फाॅर्म या चित्रपटात आहे आणि तोच लोकप्रिय झाला.

अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या यशस्वी चित्रपटात हम आपके है कौनचा समावेश होतो. हाच चित्रपट तेलगू भाषेत डब होऊन प्रदर्शित झाला.

संकलन : संजीव वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on हम आपके है कौन

  1. सर, तुमचा लेख छान आहे. माझ्या मते बॉबी चित्रपट हा पहिला चित्रपट असेल कि त्यातल्या वस्तू जसे गॉगल वगैरे सिनेमागृहामध्ये विकत मिळत होते. चूकभूल होत असेल तर क्षमा. बाकी लेख मस्टच आहे. बाकी सुरेश नावडकर सरांचे सुद्धा चित्रपटाविषयी लेख आपल्यालेख प्रमाणेच अभ्यास पूर्ण असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..