कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, “श्रीकृष्णाने” आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.
नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले व स्वतः खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, युध्दात जितके अस्त्र शस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्श करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्व अस्त्र शस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा, ह्या शस्त्राचा परिणाम हा आता तुम्ही पाहत आहात.
त्याचप्रमाणे मानवी देह आहे.
जोपर्यन्त देवाने आपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या जीवात प्राण नांदत आहे व जेव्हा तो आपणास सोडतो तेव्हा आपलीही अवस्था त्या रथसारखीच होते. त्यामुळे जीवन आनंदात जगा, मित्र व नातेवाईक हे आपल्या जीवनातले अविभाज्य घटक आहेत त्याना जपा .
Leave a Reply