नवीन लेखन...

मानवता

एकमेकांविरुद्ध असणाऱ्या गटांमध्ये खुला संवाद समजूतदारपणाकडे आणि नवं शिकण्याकडे नेतो असे म्हणतात.

अज्ञान आणि मूर्खपणा यामधील फरक- अज्ञानी लोकांना योग्य माहिती,आकडेवारी इ माहीत नसते. मूर्खांकडे ती असते,तरीही ते चुका करतात. दुनियेत बहुधा अज्ञान अधिक आहे-रोजच ते झोंबते.

हे दृश्य बदलायला पाहिजे.

मानवतावादी दृष्टिकोन (म.गांधी आणि मार्टीन ल्युथर किंगने दर्शविलेला) वापरून माणसांना एकत्र आणायला पाहिजे आणि त्यांच्यातील साम्यस्थळांकडे त्यांचे लक्ष वेधायला पाहिजे. परस्परांमधील विरोधाभासाला, विसंवादाला शस्त्रांची धार देण्याऐवजी आणि आधीच झालेल्या जखमांना अणुकुचीदार भाल्यांनी अधिक खोलवर नेण्यापेक्षा सामोपचारी मार्ग बरा!

सध्या सर्वदूर दिसणाऱ्या फुटीरतावादी मार्गापेक्षा आणि ” आम्ही व्हर्सेस तुम्ही ” या संकल्पनेपेक्षा हा मानवतावादी मार्ग भिन्न आहे. हा समझोत्याचा मध्यम मार्ग नाही. उलट याला “पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स” म्हणतात. आपल्या शिक्षणक्षेत्रात, कार्यस्थळावरील समानता, सर्वसमावेशकता अशा संकल्पनांमध्ये हा मानवता वादी मार्ग अंमलात आणणे शक्य आहे.

असहिष्णुता, अनादर, “फोडा आणि झोडा नीती ” या ऐतिहासिक टॅक्टिकस (डावपेचांच्या खेळ्या) आता जुनाट शस्त्रे झालेली आहेत. इंग्रजीत आम्ही म्हणतो- You can’t win tomorrows wars with yesterday’s weapons.

एकत्र,एका छताखाली यायचे असेल तर “पूल ” बांधायला हवेत, कारण विटा वापरून आपण परंपरेने भिंती बांधत आलो आहोत आणि त्या भिंतींमुळे विभागलो गेलो आहोत. आता पूल बांधले तर जोडले जाऊ. चर्चेने समजूत,समानुभूती आणि आकलन (दृष्टिकोन) अधिक सुस्पष्ट होतात.

सर्वांना शेवटी पाच गोष्टी हव्या असतात-
1. To be heard
2. To be respected
3. To be loved
4. To be treated fairly
5. To have those same things for their family ! ( आत्ताच पाहिलेल्या “दृश्यम- २ ” चा परिणाम)

त्वेष,तिरस्कार यांना निष्क्रिय,प्रभावहीन करायचे असेल तर आपल्याशी असहमत असलेल्या व्यक्तींच्या आस्था, वेदना, समस्या जाणून घ्यायला हव्यात. ही जोडणी आव्हानात्मक जरूर आहे पण यशस्वी झाली तर तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकेल.

“What unites us is greater than what divides us.” – John F. Kennedy या वचनावर विसंबून मी आमच्या सोसायटीच्या निवडणुकीत वाटचाल करणार आहे. कदाचित यश येईल- वादाच्या तलवारींचा कंटाळा आलाय.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..