नवीन लेखन...

मातीतील काळे सोने – ह्युमिक अँसिड

Humic Acid - The Black Gold in Soil

१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड

सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.

ह्युमस /ह्युमिक अँसिड?

ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.

ह्युमिक अँसिडचे गुणधर्म

ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.

ह्युमिक अँसिडचे फायदे –

ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

— वसंत चरमळ 

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on मातीतील काळे सोने – ह्युमिक अँसिड

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..