ह्या शांत कृष्णा काठी
मन एकचित्त घाटावरी,
राऊळे निनादे घंटा
मन प्रसन्न होईल तेव्हा..
मन होईल अवखळ वेल्हाळ
कृष्णेच्या काठी अल्लड,
बालपण सरसर आठवून
अंतरी सुखद क्षण हरवून.
किती पाहू डोळा भरुनी
सुखद दिसेल निसर्ग भवती,
मन भरुन राहतील आठवणी
सुंदर असेल ही स्वर्गीय अनुभूती..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply