हैद्राबादचा शेवटचा निजाम ‘उस्मान अली खान’ याचा जन्म ६ एप्रिल १८८६ रोजी झाला.
भारताच्या इतिहासातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर ती आहे “मीर असद अली खान चिन चिलिच खान निजाम उल मुल्क आसफ जाह सप्तम”. राव हे गावाचं नाव नसून हे एकाच माणसाचं नाव आहे. थोडक्यात हैद्राबादचा शेवटचा निजाम ‘उस्मान अली खान’, सातवा असफजहॉं.
हा निजाम भारताच्या इतिहासातला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो. त्याची एकूण संपत्ती तब्बल २३० अब्ज डॉलर इतकी होती. मुकेश अंबानी यांची संपत्ती केवळ ३० अब्ज आहे. म्हणजे २३०च्या पुढे किती शून्य असतील राव? असो. उस्मान अली खान यांच्या एकट्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल १५ करोड डॉलर्स भरत होती. आता यावरून तुम्हाला त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज येईल. त्यांच्या महालात ६००० नोकर होते आणि फक्त झुंबरं साफ करण्यासाठी ३८ माणसं तैनात असायची. १९३७ साली टाईम मॅग्झीनने उस्मान अलीचा उल्लेख ‘Richest Man On Earth’ असा केला होता. त्यावेळी उस्मान अली यांचा फोटो मॅग्झीनच्या कवरवर झळकला होता. मीर उस्मान अली खान यांनी हैदराबादवर १९११ ते १९४८ पर्यंत राज्य केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली सगळी संस्थानं देशात् विलीन करण्यात आली पण हैद्राबादच्या उस्मान अली यांनी हैद्राबाद स्वतंत्र राहील म्हणून सांगितलं. त्यांनी विलीनीकरणाला साफ नकार दिला. पण भारतीय सैन्यापुढे शेवटी त्यांनी हार मानली आणि १९४८ साली हैद्राबाद भारतात सामील झालं. हैद्राबाद ताब्यात आल्यानंतर निजामाची सर्व संपत्ती सरकारने ताब्यात घेतली. संपत्ती जाण्या आधी उस्मान यांनी लंडनमधील ‘नॅचवेस्ट’ बँकेत 1 कोटी पाउंडचे हस्तांतरण नातू मुकर्रम जहॉं याच्या नावावर केलं होतं. पण त्याच्या दुर्दैवानं ते पैसे त्याला कधीच मिळू शकले नाहीत. ब्रिटीश सरकारनं त्या रकमेचे रुपांतर वॉर बॉंड (युद्धबंदी) मध्ये केलं आणि शेवटी फिक्स डीपॉझीटच्या रुपात सर्व पैसे ब्रिटीश तिजोरीत कायमचे बंद झाले
श्रीमंत लोकांकडं आपल्या इथं थोडं वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. पण उस्मान अली यांच्या बाबतीत एक गोष्ट इथं आवर्जून सांगितली पाहिजे, ती म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण, विज्ञान आणि विकासाला खूप महत्व दिलं. तसंच त्यांच्या काळात वीज, रेल्वे, रस्ते आणि वायुमार्ग यांची सुविधा सुरु झाली. होती.
मीर उस्मान अली खान यांचे २४ फेब्रुवारी १९६७ रोजी निधन झालं.
Leave a Reply