शास्त्रीय व भजन गायक पुरुषोत्तमदास जलोटा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.
पुरुषोत्तम दास जलोटा हे शास्त्रीय आणि भजन गायक होते. पंजाबच्या फगवारा येथे जन्मलेल्या त्यांनी शाम चौरासिया घराण्याच्या मास्टर रतन यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.
त्यांनी हळू हळू भजने गायला सुरुवात केली आणि राघडी संगीतावर आधारित स्वत: अनेक भजने रचली. २००४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ते भजन सम्राट अनूप जलोटा यांचे वडील होते.
पुरुषोत्तम दास जलोटा यांचे १८ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply