लहानपणी परिस्थितीमुळे मला खूप गोष्टी शिकाव्या लागल्या. मी आठ वर्षांची असताना माझ्या आईचे निधन झाले. तुमची सहानुभूती मिळावी म्हणून मी हे सांगत नाहीए . पण ही दुःखद घटना घडली नसती तर मी बऱ्याच गोष्टी शिकू शकले नसते. उदाहरणार्थ सकारात्मक आणि खंबीर कसे व्हायचे. माझ्याबद्दल इतरेजन बोलताना बरेचदा माझं या शब्दांमध्ये वर्णन करतात . मी स्वतःबद्दल बोलताना खंबीर हा शब्द वापरते कारण तसे बनण्यावाचून मला काही पर्यायही नव्हता. हळूहळू लक्षात आले की हे तितकेसे खरे नाही. मी खंबीर असायला हवेच असं नाही. मीच तो पर्याय निवडला. इतरांच्या दृष्टीने माझे खंबीर असणे मला आवश्यक वाटत होते. त्याकाळात आणि नंतरच्या इतरही घटनांमध्ये मी स्वतःला खंबीर आणि सकारात्मक बनण्याचे धडे दिले. प्रत्यक्ष कृतीपेक्षा हे बोलणे सोपे होते हे मला जाणवलं, कारण मला त्याचा प्रत्यय आला. यामुळे मी व्यक्ती म्हणून वाढू शकले. अनुभवातून एकदा गेलं की तुम्हांला जसं बनायचं असतं तसे त्या साच्यातून तुम्ही बनता. कसे व्हायचे ही निवड तुमच्या हातात असते. मग ते खंबीर, सकारात्मक,समाधानी, समजूतदार किंवा इतर काहिही असो. त्यावर आपण काम केले पाहिजे.
प्रत्येक गोष्ट एक निवड असते, फक्त आपण ते निवडायला हवे. अधिक चांगले बनण्याचा हा प्रवास असतो.
आयुष्य नेहेमीच सोपे नसते, हे साहजिकच आहे. रोज असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. मग ती पुढची परीक्षा असो वा ज्याने तुम्हाला दुखावले आहे अशा व्यक्तीबद्दल अव्याहत विचार असोत. या साऱ्यांचा ताण पडून दुःख होणारच. आसपासच्या खूप गोष्टी तुम्हाला खाली खेचत असताना सकारात्मक राहण्याची कल्पनाही अवघड वाटते. पण हे शक्य आहे. रोज काय काय चुकले याची यादी करणे सोपे असते, पण त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. एखादयाशी मस्त संवाद जुळला किंवा व्यायामशाळेत छान मनाजोगता व्यायाम झाला ई. ई. एकदा या विहित गोष्टींची यादी बनवायला घेतली की तुमच्या लक्षात येईल -दिवस मी समजतो तितका वाईट नव्हता.आनंदी राहणे हा तुमचा हक्क आहे आणि तुम्ही आनंदी राहायला हवे. प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो आणि तत्क्षणी तसे भासले नाही तरी, सगळे काही ठरल्याप्रमाणे घडत असते. सकारात्मक दृष्टी ठेवली की कळते -एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतोच.(जरी सुरुवातीला तो दृष्टीस पडला नाही तरी). भूतकाळाबद्दल विचार करीत बसण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे आणि भविष्यातील आव्हानांबद्दल उत्सुक असावे.
जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हांला आधार देतात अशांना जवळ करा. मग पहाटे दोन वाजता रडण्यासाठी खांदा पुढे करतो तो तुमचा नवरा असो वा तुम्ही रडेपर्यंत हसविणारा जिवलग मित्र असो. तुमचे कोण आहेत हे जाणून घ्या. जे तुमचा सांभाळ करतात अशांना कायम आसपास ठेवा. ही आश्चर्यकारक यंत्रणा किती प्रभावी असते हे तुमच्या लक्षात येईल. मात्र या व्यक्तींना गृहीत धरण्याची चूक करू नका. त्यांचे तुमच्या जीवनात असणे यामागे निश्चित कार्यकारण भाव असतो आणि तुमच्या चेहेऱ्यावर हास्य यावे यासाठी त्यांची योजना असते.
काहीवेळा तुम्हाला स्वतःचा सूर्यप्रकाश निर्माण करावा लागतो. स्वतःवर लक्ष केंद्रित केले की स्वतःला समजण्यास मदत होते आणि स्वतःसाठी काय चांगले आहे हेही कळते. मग स्वतःच्या सहवासात सुख शोधायला तुम्ही शिकाल. तुम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी इतरांवर टाकू नका हा महत्वाचा धडा मी शिकलेय. आधी स्वतःवर खुश राहा मग ती ख़ुशी वाढवायला जे मदत करतील यांचा शोध घ्या. तशा व्यक्तीचा शोध संपेपर्यंत निर्धास्त राहा. दिवसाखेरी तुम्हाला फक्त स्वतःला आनंदी ठेवायचे आहे हे विसरू नका. सकाळी उठताना ‘आजचा दिवस चांगलाच जाईल” असं स्वतःला बजावत उठा. वाटेवर येणाऱ्या अनपेक्षित संधींचा लाभ उठवायला सज्ज व्हा.
जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील. गती धीमी करून प्रत्येक अनुभव जगा आणि आसपासच्या घटनांची नोंद घ्या. काहीतरी लाभाच्या अपेक्षेपासून स्वतःची सुटका करून घ्या आणि हरेक क्षणाचा आनंद घ्या. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल करूणा बाळगा. तुम्ही स्वतःच एक विलक्षण व्यक्ती आहात याचा विसर पडू देऊ नका. जीवनाला तुमच्यातील चांगलं निवडण्याची संधी देण्यापेक्षा जगाला दाखवून दया की तुम्ही एकमेवाद्वितीय आहात. आभारी राहायला शिका ,कृतज्ञ राहायला शिका आणि दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला शिका. मला एक सुवचन माहीत आहे -“अधिक चांगल्याचा परिचय होईपर्यंत सर्वोत्कृष्ट काम करा आणि नंतर ते चांगलं काम करा.”
मला आशा आहे माझे हे अनुभव इतरांना उपयोगी पडतील. आयुष्य हे कायम एक आव्हान आहे तेव्हा हातपाय गाळू नका. कायम खंबीर आणि सकारात्मक विचार करा.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply