आयफोन हा स्मार्टफोनचा एक प्रकार आहे. त्यात आयपॉड व सेलफोन या दोन्हींचा समावेश असतो. पहिला आयफोन अॅपल कंपनीचे प्रमुख स्टीव्ह जॉब्ज यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत तयार केला. ९ जानेवारी २००७ मध्ये त्यांनी आयफोन मॅकवर्ल्ड परिषदेत सादर केला. आयताकृती असा काळ्या रंगाचा हा फोन अतिशय पातळ व आकर्षक असा होता, त्याची विक्री सुरू होण्यास २९ जून २००७ ही तारीख उजाडली होती.
अॅपल कंपनीने हा फोन तयार करण्याच्या प्रकल्पात १५ कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती. तीस महिन्यांच्या संशोधनानंतर आयफोनचा जन्म झाला. जॉब्ज यांनी सादर केलेला पहिला आयफोन हा टचस्क्रीन स्वरूपातील होता. हाताच्या बोटांनी आपण पडद्यावर जेव्हा हालचाली घडवून आणू शकतो हा त्याकाळी एक चमत्कारच होता.
आयफोन हा हाताच्या पंजावर बसू शकणाऱ्या पामटॉप संगणकासारखाच असतो. त्याचा उपयोग कॉल्स घेण्यासाठी करण्यासाठी तर होतोच, शिवाय त्याच्या मदतीने गाणी, संगीत ऐकता येते. वेबब्राऊजिंग, छायाचित्रण, टेक्स्ट मेसेजिंग, व्हिज्युअल व्हॉईस मेल, पोर्टेबल मीडिया प्लेयर, ईमेल, वायफाय अर्थवेध अशा अनेक सुविधा त्यात असतात.
आयफोनची पहिली पिढी म्हणजे आयफोन ओ.एस., दुसरी पिढी म्हणजे थ्रीजी, तिसरी पिढी म्हणजे आयफोन ३ जीएस, चौथी पिढी म्हणजे आयफोन-४ होय. यातील थ्री जी आयफोनला जीपीएस रिसीव्हर २००९ असतो.मध्ये आयफोन थ्रीजीएस अॅपलने आणला, त्याची माहिती साठवण्याची क्षमता अधिक होती. त्याच्या कॅमेऱ्यात सेकंदाला ३० फ्रेम्स घेतल्या जात होत्या.
यात दिशादर्शकही होता, त्यामुळे अज्ञात ठिकाणी आपण कुठे जात आहोत हे समजण्याची सोय होती. स्टीव्ह जॉब्ज यांनी २०१० मध्ये आयफोन ४ सादर केला आहे. त्यात ४ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे असून डिस्प्लेही अधिक आकर्षक व स्पष्ट प्रतिमा दाखवणारा आहे. यात कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, नोटपॅड असेही उपयोग आहेत.
या फोनचा स्क्रीनही हवा तसा आकार बदलू शकतो. आयफोनमध्ये प्रोसेसर व सॉफ्टवेअर असे दोन प्रमुख भाग असतात. टचस्क्रीनला स्पर्श करताच जिथे स्पर्श झाला आहे त्याबाबतची कच्ची माहिती ही प्रोसेसरकडे जाते नंतर प्रोसेसर स्मृतीतील सॉफ्टवेअरकडे जाऊन त्या स्पर्शातून मिळालेल्या कच्च्या माहितीच्या आधारे अर्थ लावतो व योग्य ती क्रिया साधली जाते.
ध्वनिलहरी, हाताची स्पंदने यातून विद्युतप्रवाह, ध्वनिलहरी यांच्यात जे बदल होतात त्यांच्या आधारे स्पर्शाचा अर्थ लावला जातो. ३२ जीबी क्षमतेचे आयफोनही उपलब्ध आहेत. आता सर्वांनाच आयफोन ५ ची प्रतीक्षा आहे.
Leave a Reply