नवीन लेखन...

जेम्सबॉण्ड 007 या जेम्स बॉण्डचा जनक इयान फ्लेमिंग

जेम्सबॉण्ड 007 या जेम्स बॉण्डचा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे १९०८ रोजी लंडन येथे झाला.

जगातील गुप्तहेरांचा विषय आला म्हणजे सगळ्यात पहिले आठवतो तो म्हणजे एमआय 6 या गुप्तहेर संघटनेचा जगभरात गाजलेला गुप्तहेर जेम्स बॉण्ड. भारदस्त व्यक्तिकमत्व, बलदंड शरीरयष्टी, कधीही हार न मानण्याची वृत्ती, नेहमीच वेगवेगळ्या क्लृरप्त्या लढवून विजयश्री खेचून आणणारा जेम्स बॉण्ड म्हणजे एक काल्पनिक पात्र आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.

जेम्स बॉण्डचा जन्म १९५२ ला कॅसिनो रॉयाल या कादंबरीत झाला. ही कादंबरी लिहिली होती ब्रिटीश लेखक इयान फ्लेमिंग यांनी. ही कादंबरी लोकप्रिय होण्यासोबतच सर्वाधिक खपाची झाली. त्यामुळे यानंतर १९६३ ते १९६६ या कालावधीत फ्लेमिंग यांनी आपला मानसपूत्र बॉण्डवर ११ कादंबऱ्या आणि दोन लघुकथा लिहिल्यात. ००७ या आपल्या कोडनेमने प्रसिध्द असलेला गुप्तहेर जेम्स बॉण्ड हा एमआय ६ या संघटनेचा एजंट आणि रॉयल नेव्हीतील रिजर्व्ह कमांडर. आजवर काल्पनिक पात्रांवर बेतलेल्या कादंबऱ्यांमध्ये सर्वाधिक खपाचा मान जेम्स बॉण्डच्या कादंबऱ्यांना जातो. जगभरात आजवर या कादंबऱ्यांच्या १० करोडपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की, फ्लेमिंग यांच्या मृत्यूनंतरही या जेम्स बॉण्डची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आज ५४ वर्षानंतरही जेम्स बॉण्डला केंद्रित ठेवून कथानक लिहिले जात आहे आणि चित्रपटाद्वारे हे सादरही होत आहे. लेखकाच्या मृत्यूनंतर पाच दशके उलटून देखील जेम्स बॉण्डचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर अजूनही जिवंत आहेत.

अर्थात ह्या सर्वांची सुरुवात ज्या इयान फ्लेमिंगच्या लेखणीतून साकारली. एका संपन्न परिवारामध्ये इयान फ्लेमिंग यांचा जन्म झाला. त्यांनी ईटन, सॅण्डहर्स्टसह म्युनिख आणि जिनेव्हा युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतले. इयान यांचे वडील व्हॅलेन्टाइन फ्लेमिंग ब्रिटीश संसदेचे सदस्य होते तर आजोबा रॉबर्ट फ्लेमिंग स्कॉटिश अमेरिकन इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि मर्चन्ट बँक रॉबर्ट फ्लेमिंग ॲ‍ण्ड कंपनीचे संस्थापक होते. इयान फ्लेमिंग यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या केल्या. या नोकऱ्यांदरम्यान आलेला अनुभवच त्यांना जेम्स बॉण्डचे पात्र हुबेहूब साकारण्यात झाला असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात इयान यांनी ब्रिटनच्या नाविक दलाच्या गुप्तहेर खात्यात नोकरी केली आणि त्याच ठिकाणी काम करताना त्यांच्या डोक्यात साकारले ऑपरेशन गोल्डन आयचे कथानक. याच दरम्यान युनिटो २० असॉल्ट युनिट आणि टी फोर्स ह्या दोन गुप्तहेर संघटना उभारण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली झाले. युध्दकाळातील ही नोकरी आणि त्यानंतर केलेल्या पत्रकारितेतील नोकरीने जेम्स बॉण्डकरिता भरपूर खाद्य इयान यांना उपलब्ध झाले. या अनुभवावरच आधारित १९५२ मध्ये पृथ्वीतलावर अवतरला जेम्स बॉण्ड ००७.

जेम्स बॉण्डचे नाव सांगण्याची पध्दत देखील खास अशीच होती, ‘माय नेम इज बॉण्ड जेम्स बॉण्ड’. याचपध्दतीने इयान यांचा परिचय आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या इस्टाईलने करायचा झाला तर ‘नाम है फ्लेमिंग, इयान फ्लेमिंग…रिश्ते में तो हम जेम्स बॉण्ड के बाप लगते है’ इयान यांनी साकारलेल्या जेम्स बॉण्डवर आजवर २४ चित्रपट झाले आहेत. जेम्स बॉण्ड म्हणजे तंदुरुस्त, चतुर आणि देखणा एजंट आहे. पण त्याला काही व्यसनेदेखील आहेत. दारु पिणे, सिगरेट पिणे, जुगार खेळणे तसेच त्याला बायकांमध्ये विशेष रुचि आहे.तंत्रज्ञानाची आवड असल्याने तो ॲ‍डव्हान्स टेक्नॉलॉजीची हत्यारे आणि गाड्या वापरतो. तो शार्पशूटर आहे, हत्यार नसतांनाही समोरच्या दुश्मनावर विजय प्राप्त करू शकतो. त्याला स्केटिंग, स्कीइंग, स्विमिंग, गोल्फ येते. लोकांना मारण्यात त्याला काहीही वाटत नाही पण त्याला ऑर्डर असल्याशिवाय किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी, बदला घेण्यासाठीच तो लोकांचे जीव घेतो.

जेम्स बॉण्डवर आलेल्या चित्रपटात सर्वात आधी आला तो १९६२ साली डॉक्टर नो इओन प्रॉडक्शनने निर्मित केलेल्या या चित्रपटात शॉन कॉनरीने जेम्स बॉण्ड साकारला होता. हा इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीवर आधारीत चित्रपट होता. त्यानंतर १९६३ साली आला फ्रॉम रशिया विथ लव हा चित्रपटदेखील इओन प्रॉडक्शनची निर्मिती होता. शॉन कॉनरी बॉण्ड होते. १९५७ मध्ये इयान यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला होता. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत पहिल्या बॉण्डपटाला कैकपटीने मागे टाकले आणि जेम्स बॉण्ड जगभरात प्रसिध्दी पावला.

तिसरा चित्रपट गोल्डफिंगर १९६४ साली आलेल्या या चित्रपटात शॉन कॉनरी बॉण्ड आणि इयान यांच्या याच नावाने प्रसिध्द असलेल्या कादंबरीवर चित्रपट बेतला होता. या चित्रपटाला बॉण्डपटात प्रथमच ॲ‍केडमी ॲ‍वार्ड मिळाला. चित्रपटाचा खर्च प्रदर्शनानंतर दोन आठवड्यातच वसूल झाला.

नंतर १९६५ मध्ये चौथा बॉण्ड पट आला थंडरबॉल. यात शॉन कॉनरीच पुन्हा जेम्स बॉण्ड होते. इयान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित या बॉण्डपटाने १४१.२ मिलियन डॉलरची कमाई करुन आधीच्या तिन्ही बॉण्डपटांना मागे टाकले. यानंतर मात्र इयान यांच्या कादंबरीव्यतिरिक्तम कथानक असलेला यू ओन्ली लिव ट्वाईस हा बॉण्डपट आला. यात शॉन कॉनरी बॉण्ड होते. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि १११ मिलियन डॉलरची कमाई या बॉण्डपटाने केली. शॉन कॉनरी बॉण्ड असलेला सहावा चित्रपट आला १९६९ मध्ये ऑन हर मॅजेस्टिज सिक्रेट सर्व्हिस. याचे कथानक इयान फ्लेमिंग यांच्या याच नावाच्या कादंबरीवरुन होते. चित्रपट चांगला झाला पण आधीच्या बॉण्डपटांची प्रसिध्दी आणि कमाई दुर्दैवाने करु शकला नाही. या चित्रपटानंतर शॉन कॉनरी यांनी बॉण्डपटातून निवृत्त होण्याची घोषणा केली. मात्र तरीही १९७१ मध्ये आलेल्या डायमंड्स आर फॉरएव्हर या चित्रपटात त्यांनी बॉण्ड साकारला.

इयान फ्लेमिंगच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात बॉण्ड हिऱ्यांची स्ममलिंग रोखतांना दाखविण्यात आला होता. चित्रपट यशस्वी ठरला पण समीक्षकांच्या पातळीवर नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यात. यानंतर शॉन कॉनरी यांनी बॉण्डपट केला नाही. यानंतर बॉण्डपटातील आठवा चित्रपट आला लिव ॲ‍ण्ड लेट डाय या चित्रपटात रॉजर मूर यांनी बॉण्ड साकारला होता. निर्मात्यांना शॉन कॉनरीच बॉण्ड म्हणून अपेक्षित होता मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर रॉजर मूर यांनी ही भूमिका साकारली. इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात ड्रग माफियांचा पर्दाफाश करणारा या बॉण्डपटाने आपली जादू प्रेक्षकांवर कायम राखत ॲ‍िकडमी ॲ‍वॉर्डसाठी नामांकनदेखील मिळविले.

बॉण्डपटातील नववा चित्रपट आणि रॉजर मूर यांचा दुसरा बॉण्डपट द मॅन विथ द गोल्डन गन याचे कथानक इयान फ्लेमिंग यांचे नव्हते. बॉण्डपटातील सर्वात खराब चित्रपट म्हणून हा ओळखला जातो. यात बॉण्डपेक्षा क्रिस्तोफर ली यांनी साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. असे असूनही बॉण्डपटातील सर्वाधिक कमाई करणार्याे चार चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. यानंतर रॉजर मूर यांच्या तिसरा तर बॉण्डपटातील दहावा चित्रपट स्पाय हू लव्ह मी आला. या चित्रपटाचे टायटल फक्तर इयान फ्लेमिग यांच्या कादंबरीचे होते. या चित्रपटाने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळविली. तीन ॲ‍कडमी ॲ‍वार्डकरिता नामांकनदेखील मिळाले.

१९७९ मध्ये मूनरेकर हा बॉण्डपटातील ११ वा व रॉजर मूर यांचा चौथा बॉण्डपट. स्पेस शटल चोरीचा शोध घेणार्यान या बॉण्डपटातील साहसदृश्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सर्वाधिक निर्मिती मूल्य असणार्याह चित्रपटाने आजवरच्या सर्वच बॉण्डपटांपेक्षा अधिक कमाई केली.

रॉजर मूर यांचा पाचवा आणि बॉण्डपटातील १२ वा चित्रपट फॉर युवर आइज ओन्ली फ्लेमिंग यांच्या दोन लघुकथांचे कथानक एकत्र करून रिचर्ड मॅब्यून आणि मायकल जी विल्सन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. १९५.३ मिलियन डॉलरची कमाई करणारा हा बॉण्डपट होता.

ऑक्टोपसी हा बॉण्डपटातील १३ वा व रॉजर मूर यांचा सहावा बॉण्डपट. चित्रपटाचे टायटल फ्लेमिंग यांची लघुकथा ऑक्टोपसीवरून घेतले होते. शीतयुध्दावर आधारीत कथानक असलेल्या या चित्रपटाची खासियत म्हणजे आजवर बॉण्डपटांची निर्मिती करणाऱ्या इओन प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली नव्हती. इयान यांची फ्रम ए व्यू टू किल या लघुकथेवर आधारित याच नावाचा चित्रपट १९८५ मध्ये आला.

रॉजर मूर यांचा सातवा आणि १४ वा बॉण्डपट असलेल्या या चित्रपटात बॉण्ड खलनायकाच्या सिलिकॉन व्हॅली नष्ट करण्याच्या प्लॅनला सुरुंग लावतो. बॉक्स ऑफिसवर चित्रपट गाजला असला तरी गोल्डन ग्लोबमध्ये यातील गाण्याला नामांकन मिळाले होते. यातील खलनायक क्रिटोफर वाल्केन यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटानंतर रॉजर मूर यांनी बॉण्डपटातून निवृत्ती स्वीकारली. बॉण्डपटातील १५ वा चित्रपट द लिविंग डेलाइट्स (१९८७) यात टिमोथी डॉल्टन जेम्स बॉण्डच्या रुपात पडद्यावर दिसले. चित्रपटाचे टायटल फ्लेमिंगच्या लघुकथेवर होते. यानंतर फ्लेमिंग यांचे टायटल असलेला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झालेला कॅसीनो रोयाल हाच होता. या चित्रपटाने इतर बॉण्डपटांप्रमाणे यश मिळवत 191.2 मिलियन डॉलरची कमाई केली. ‘लायसन्स टू किल’ हा बॉण्डपटातील १६ वा तर टिमोथी डॉल्टन यांचा दुसरा बॉण्डपट. फ्लेमिंग यांच्या लघुकथेतील काही भागावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात बॉण्ड एम.आय. ६ मधून सस्पेंड होतो. या चित्रपटातील साहसदृश्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटापासून बॉण्डपटातील हिंसा अधिक वाढल्याचे म्हटले जाते.

बॉण्डपटातील १६ वा चित्रपट गोल्डन आय १९९५ मध्ये आला. या चित्रपटात पियर्स ब्रॉसनने डॉल्टनची जागा बॉण्ड म्हणून घेतली. डॉल्टनच्या बॉण्डपटापेक्षा या चित्रपटाला अधिक यश मिळाले. 350.7 मिलियन डॉलरचा व्यवसाय करणार्याा या चित्रपटात बॉण्डचे अत्याधुनिक रुप सादर करण्यात आले होते. बॉण्डपटातील सर्वाधिक लोकप्रिय बॉण्ड म्हणून शॉन कॉनरीनंतर पियर्स ब्रॉसन याला प्रेक्षकांनी पसंद केले. तिसरे महायुध्द थांबवण्यात यशस्वी झालेला बॉण्ड टूमॉरो नेव्हर डाइज या चित्रपटात साकारण्यात आला. १८ वा बॉण्डपट आणि पियर्स ब्रॉसनचा दुसरा बॉण्डपट. यशाच्या आणि ताकदीच्या मस्तीत असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या मालकाचे तिसरे महायुध्द करण्याचे स्वप्न या चित्रपटात बॉण्ड अयशस्वी करतो. नेहमीप्रमाणे यश मिळवत या बॉण्डपटाने गोल्डन ग्लोबकरिता नामांकन मिळवले. गोल्डन आयपेक्षा या चित्रपटाने अधिक व्यवसाय केला. हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस मध्ये वापरल्या गेलेल्या एका वाक्यावर आधारित द’ वल्ड इज नॉट इनफ’ हा १९९९ मध्ये आलेला पियर्स ब्रॉसनचा तिसरा तर बॉण्डपटातील १९ वा बॉण्डपट. अब्जाधीश सर रॉबर्ट किंग यांच्या मर्डर मिस्ट्रीचे कथानक असलेल्या चित्रपटाने 361,832,400 डॉलरची कमाई केली. नॉर्थ कोरियन कर्नलचा खून केल्याच्या आरोपात अडकलेला बॉण्ड 14 महिन्यांनंतर क्रिमिनल एक्सेंज प्रोग्रॅममध्ये सुटतो. ब्रिटीश सरकारमधीलच कोणीतरी आपल्याला या आरोपात अडकवले असल्याच्या संशयाने त्याचा शोध घेऊन बदला घेणारा बॉण्ड साकारणारा ‘डाय अनदर डे’ २००२ साली आलेला हा पियर्स ब्रॉसन याचा ४ था तर बॉण्डपटातील २० वा चित्रपट होता. दरवेळाप्रमाणे या चित्रपटानेही यश संपादन केले. मात्र पियर्स ब्रॉसनने या चित्रपटानंतर बॉण्डपटातून निवृत्ती घेतली.

इयान फ्लेमिंग यांनी लिहिलेली बॉण्ड सिरीजमधील पहिली कादंबरी कसीनो रोयालचे कथानक घेऊन आलेला याच नावाचा चित्रपट २००६ मध्ये आला. यात डेनियल क्रेग या ब्रिटीश कलावंताने बॉण्ड साकारला. डेनियल क्रेगच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातील बॉण्ड हा आधीच्या बॉण्डपेक्षा अधिक कणखर दाखविण्यात आला होता. या चित्रपटाने 599 मिलियन डॉलरची कमाई केली. बॉण्ड आपली प्रेमिका वेस्पर लायंडच्या मृत्यूचा बदला घेताना साकारला आहे डेनियल क्रेगचा दुसरा तर 22 वा बॉण्डपट क्वा्टंम ऑफ सोलेस (2008) या चित्रपटात. बॉण्डपटातील सर्वाधिक हिंसात्मक असलेल्या या चित्रपटाने आजवरच्या बॉण्डपटातील मारधाडीचे रेकॉर्ड तोडले. 586 मिलियन डॉलरचा व्यवसाय या चित्रपटाने केला. बॉण्डपटातील २३ वा व डेनियल क्रेगचा तिसरा बॉण्डपट स्कायफॉल २०१२ मध्ये आला. एम.आय.6 वर हल्ल्याची चौकशी करणारा बॉण्ड या चित्रपटात साकारण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रिमिअरनंतर अमेरिका आणि ब्रिटनमधील प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. दोन बाफ्टा, दोन ॲ‍कॅडमी आणि दोन ग्रॅमी ॲ‍वार्ड मिळवत या चित्रपटाने एक हजार मिलियन डॉलरचा व्यवसाय केला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करणारा बॉण्ड स्पेक्टर (2015) या चित्रपटात डेनियल क्रेग चवथ्यांदा दिसला. बॉण्डपटातील हा २४ वा चित्रपट होता. २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

इयान फ्लेमिंग यांचे १२ ऑगस्ट १९६४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..