नवीन लेखन...

इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !

पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे. मानवाच्या अथक वैद्यकिय व वैज्ञानिक प्रयोगानंतर मानवाने वयोमर्यादा वाढविण्यात नक्कीच यश संपादन केले आहे यात वादच नाही पण याचा थोडया वेगळया कलाने व वास्तवाचे भान ठेऊन विचार केल्यास नाण्याला जश्या दोन बाजू असतात तसे मतमतांतर विषद करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रातील मुद्दे आजुबाजूला घडणार्‍या घटनांचा घेतलेला मागोवा आहे. असो.कुठल्याही माणसाला मरण म्हंटले की अंगावर काटा उभा राहतो. कारण त्याचा जीव संसारात आपल्या माणसांत व इतर स्थावर व जंगम मालमत्तेत तसेच विलासी व चैनी उपभोगात तसेच अतृप्त इच्छेत गुंतलेला असतो याला काही माणसं अपवाद असू शकतील.आज आपल्या सर्वांचे दैनंदिन जीवन घडयाळातील सेकंद काटयाबरोबर स्पर्धा करणारे ठरल्याने प्रत्येक जीव मेटाकूटीस आला आहे. त्यातच वाढती लोकसंख्या व निसर्गाची अनियमितता आपल्याला येणार्‍या काळाची चुणूक दाखवत आहे. यातून आपण सर्व काही शिकलो तर येणार्‍या काळात आपला निभाव लागणार आहे नाही तर….!आपणच या सुंदर वसुंधरेचे लचके तोडले आणि कमी म्हणून की काय विज्ञानाच्या आधारावर केलेल्या नवनवीन शोधांनी आपलेच हातपाय बांधून गळयाभोवती फास आवळत आहोत.काही माणसं अपघातात झालेल्या शारिरीक व मानसिक नुकसानीने यमयातना भोगत आहेत. पण काही माणसे महिनो म
िने वर्षोंनवर्षे हॉस्पिटल घरी किंवा वृद्धाश्रमात जीवन कंठीत आहेत. काही रूग्णांचे असाध्य आजार

जसे कँसर एडस् व कोमात गेलेले समाजानी उपेक्षीलेले व समाजतील नागरीकांकडून मिळणार्‍या वागणूकीला कंटाळलेले आप्तांनी व नातेवाईकांनी टाकलेल्यांना जीवनाचा कंटाळा आला आहे. त्यांना इच्छा मरण हवं आहे. स्वित्झर्लंड सारखा देश सोडल्यास कुठल्याही देशात इच्छा मरणाचा कायदा अस्तित्वात नाही.“सुखांत” या चित्रपटात वरील विषयाबद्दल जनजागृती करण्याचा बराच प्रयत्न केला गेला आहे. पण वास्तवात मरण कोणाला नको आहे. डॉक्टरमंडळी रूग्णाला जास्तीत जास्त मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयास करीत असतात. प्रत्येक जीवाला त्याच्या पूर्वसुकृता प्रमाणे भोग हे भोगलेच पाहिजेत. पण काही जीवांकडे श्रद्धा व सबुरीच्या अभावाने सहनशिलता व विश्वास नसतो. इच्छाशक्ति आधिच मेलेली असते. त्यामुळेच त्यांना इच्छा मरण हवे असते आणि ते न मिळाल्याने बरेच आत्महत्या करताना दिसतात. सर्व वयातील लहान मुलं पुरूष स्त्रिया त्यात अतिवृद्ध यातना सहन न झाल्याने ओरडत आहेत आणि जिवाच्या अकांताने सांगत आहेत आंम्हाला जगायचे नाही आंम्हाला मरायचे आहे काहीतरी करा.एकदा वाटते हा कायदा होणे आवश्यक आहे. निदान असे रूग्ण यातनांना पासून कायमचे सुटतील पुढील जन्मात याहून जास्त यातना भोगण्याची वेळ येईल तिथपर्यंत तरी सुटका. हा कायदा बविण्यासाठी इतर संबंधीत कायद्यात बदल किंवा रद्द करावे लागतील. इच्छामरणाच्या कायद्याचा दुरूपयोग होण्याचे चान्सेस जास्त वाटतात. अश्या पीडित रूग्णांनी उचीत काळ वेळाची वाट बघणे एवढेच त्यांच्या नशिबी आहे.काही सुचत नाही आणि मनाची व्दिधा अवस्था होते आणि आपोआप परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करताना आपल्या तोंडून नकळत शब्द निघतात यांना एकदाच्या या मरण यातना तू
सोडव रे बाबा !जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..