बातमी : इच्छामरणासाठी लवाटे दांपत्याची राष्ट्रपतींना हाक
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ११.०१.२०१८, पृ. ९
विभाग – २
- इच्छामरण : थोडी चर्चा :
- खरें ‘इच्छामरण’ वेगळेंच आहे. तें म्हणजे, भीष्मांसारखें-शरपंजरीं-नसतांनाही, आपण स्वत:होऊन मरणपंथ स्वीकारणें . याची कांहीं उदाहरणें आहेत, हिंदू पद्धत ‘प्रायोपवेशन’, जैन पद्धत ‘संथारा’ व जपानी पद्धत ‘सेप्पुकु’. हे तिन्ही प्रकार, ‘A Dignified Death, through one’s own free-will & decision’ , अशा प्रकारचे आहेत. यांपैकी भारतीय प्रकार प्रयोपवेशन आणि संथारा हेच आपण तूर्तास चर्चा करतांना नजरेसमोर ठेवूं या.
- कायद्यानुसार, आत्महत्या हा शिक्षापात्र गुन्हा आहे. ( आत्महत्येवरील चर्चा या लेखाच्या कक्षेबाहेर आहे). खरें तर, प्रायोपवेशन काय, किंवा संथारा काय, दोन्ही, ‘आत्महत्या’ या सदरात मोडत नाहींत. म्हणूनच जैन कम्युनिटीनें सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलेला होता / आहे , की संथाराला ‘आत्महत्या’ या सदरात गणलें जाऊं नये. प्रायोपवेशनाबद्दल एखाद्या NGO ने अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे काय, याची कल्पना नाहीं ; मात्र , केला नसेल, तर करायला हवा.
- जुनी घटना आहे. माझ्या बडोदा येथील शेजार्याच्या वृद्ध काकांचें अहमदाबादला निधन झाल्याचें कळल्यामुळे मी त्याला भेटायला गेलो. तो जैन होता. तो म्हणाला, ‘माझ्या काकांनी संथारा केला. अशा व्यक्तीच्या जाण्याबद्दल आम्ही शोक पाळत नाहीं. उलट, त्यांनी स्वत: विचारपूर्वक मृत्यूला कवटाळलें म्हणून आम्ही त्या व्यक्तीचा सन्मान करतो’ .
- मला अशा अन्य दोन तरी घटना माहीत आहेत, जेथें ८०-९० वर्षांच्या संबंधित व्यक्तींनी अन्न-पाणी क्रमश: त्यागलें, व त्यानंतर चारएक आठवड्यात त्यांचें निधन झालें. याला कुणी ‘प्रायोपवेशन’ असें नांव द्या अथवा देऊं नका, पण सांगा, हें दुसरें काय आहे ?
- स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेंच आचार्य विनोबा भावे या थोर व्यक्तींनी प्रायोपवेशन केलें ही गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे.
- पण, सावरकर किंवा विनोबा यांच्यावर पोलीसांनी ‘आत्महत्येची केस’ केल्याचें ; किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन व जबरदस्तीनें लिक्विड् पाजून प्रायोपवेशनापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचें, ऐकिवात नाहीं. कां बरें ? ते थोर होते, म्हणून ? थोर तर ते होतेच ; व त्यांच्यात जबरदस्त आत्मिक बल होतें, हें खरें आहे. पण, सामाजिक आणि कायद्याशी संबंधित प्रश्न असा आहे की, जी गोष्ट थोरांना, सरकार-पोलीस-न्यायपालिका व समाज ‘अलाऊ’ ( allow) करतात, ती सामान्यजनांना कां ‘अलाऊड्’ ( allowed) नाहीं ?
व्यक्ती सर्वसामान्य असो अथवा थोर, प्रायोपवेशन व संथारा यासाठी लागणारे जबरदस्त आत्मिक बल दोघांमध्येही असतेंच . (अशा बलावाचून, कोणीही ३०-४० दिवस, स्वत:होऊन, willingly, अन्न-पाणी वर्ज्य करून राहूंच शकणार नाहीं ) . त्यामुळे, त्या दोन्ही catagories च्या बाबतीत ऑथीरिटीज् चें वर्तनही सारखेंच ( सेऽम , same ) असायला नको कां ?
- लढाईत जे स्वत: होऊन प्राणार्पण करतात, त्यांचा आम्ही आदर-सन्मानच करतो, मग ते बाजी प्रभू असोत, मुरारबाजी असोत, भारताच्या स्वतंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक किंवा सामान्यजन असोत, युद्धात सीमेवर लढणारे-पडणारे सैनिक असोत, अथवा टेररिस्टांशी व समाजकंटकांशी झुंजणारे पोलीस असोत.
- हा सन्मान आहे, मृत्यूची भीती न वाटण्यांबद्दल , स्वत: होऊन मृत्यूला कवटळण्याबद्दल, त्या व्यक्तींच्या असामान्यत्वाबद्दल. स्वातंत्र्यवीर सावरकर व विनोबा भावे यांचा उल्लेख वर केलाच आहे ; त्यांचाही आपण या बाबीबद्दल सन्मानच करतो. हाच सन्मान आपण इच्छामरण स्वीकारणार्या ‘साधारण’ जनांनाही द्यायला हवा, कारण या बाबतीत तेही तेवढेच ‘असामान्य’ असतात.
- कायद्याची बात :
- कायदा हा, व्यक्ती-व-समाज यांच्या आपसातल्या संबंधांबद्दल नियम बनवतो. व्यक्तीच्या ज्या कृतीमुळे सामाजिक हानी होते ( जसें की, चोरी, दरोडा, मॅनस्लॉटर, मर्डर, सार्वजनिक प्रॉपरटीची नासधूस, वगैरे). सर्वच माणसें अधूनमधून लहानसहान ‘खोटें’ बोलत असतात, पण प्रत्येक असें खोटें बोलणें हा शिक्षापात्र गुन्हा गणला जात नाहीं. मात्र, एखाद्या गुन्ह्याच्या तपासाच्या अंतर्गत पोलीसांशी खोटें बोलणें, कोर्टात शपथेवार खोटें बोलणें, हें गुन्हा मानलें जातें.
- पण, ज्या कृत्यानें समाजाची कांहीं हानी होत नाहीं, ती (उदा. – इच्छामरणाची ) कृती गुन्हा कशी? वृद्ध झालेल्या जनांना जर असें वाटत असेल की,
- आम्ही आमचें जगातलें कार्य केलेलें आहे ; आतां यापुढे आम्ही जगून समाजासाठी कांहींच काँट्रिब्यूट् करूं शकणार नाहीं .
- आम्हाला ‘डिग्निफाइड् डेथ्’ हवी आहे, गलितगात्र होऊन पडण्यापेक्षा, जवळच्यांना तशा अवस्थेत आमची काळजी घ्यायचा त्रास देण्यापेक्षा, आणि पर्यायानें त्यांचा ‘प्रॉडक्टिव्ह टाइम्’ ‘नको-त्या-कामामध्ये’ वाया घालवण्यापेक्षा, आम्हाला इच्छामरण हवें आहे ; आम्ही धडधाकट आहोत तोंवरच आम्हाला शांतपणें मृत्यूला जवळ करायचें आहे .
तर, अशा व्यक्तींना स्वत:च्या मृत्यूसंबंधीच्या स्वयंनिर्णयाचा अधिकार नको कां ? कां नको ?
- आपलें संविधान प्रत्येक व्यक्तीला बरेच ‘राइट्स्’ , मूलभूत अधिकार देतें, ( जसें की राइट् टू प्रायव्हसी, फ्रीडम ऑफ् एक्स्प्रेशन, वगैरे) . त्यांत ‘राइट्–टू–ओन्–लाइफ्’ सामील नाहीं कां ? समाजाची-हानी-करणारा-कसलाच-संबंध इच्छामरणात येत नाहीं ; तर मग असें इच्छामरण ही एक खाजगी, प्रायव्हेट् बाब ठरते, आणि ‘राइट् टू प्रायव्हसी’ च्या अंतर्गत सुद्धा अशा मरणाला परवानगी ही गृहीतच धरायला हवी.
- लागल्यास, सरकारनें असे कांहीं नियम घालून द्यावेत, ज्याद्वारें हें स्पष्ट करून घेतां येईल की एखाद्या व्यक्तीनें इच्छामरणाचा निर्णय स्वखुशीनें घेतला आहे, कोणाच्याही कसल्याही दबावामुळे नाहीं. झालें.
समारोप :
- ज्यांना जीवन जगण्याची आस आहे , व / किंवा ज्या व्यक्तींना ‘आपण आपलें (समाजहिताचें) कार्य शेवटच्या श्वासापर्यंत करत रहावें ’ असें वाटतें, अशां व्यक्तींना शतायुषी होण्याचा, किंवा त्याहीपेक्षा-अधिक जगण्याचा अधिकार आहेच. पण, ज्यांना ( खास करून ज्येष्ठ नागरिकांना) ‘अल्विदा’, ‘गुड् बाय्’ असें म्हणून आनंदानें जगाचा निरोप घ्यायचा आहे , अशांनाही त्यांचा तो अधिकार मिळायलाच हवा. तेंच नीतीयुक्त आहे .
- इच्छामरणाचा ‘प्रश्न’ हा नेहमीच महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे. आतां लवाटे दांपत्यामुळे तो ऐरणीवर आला आहे. तसा तो ऐरणीवर आणल्याबद्दल त्यांचे आभार.
- आणि अशा अजून कितीतरी व्यक्ती असूं शकतील, ज्यांच्या मनांत अशीच इच्छा आहे, पण ज्यांनी अजूनतरी तो प्रश्न ‘पब्लिक’ केलेला नाहीं. लावटे यांच्यासहित अशा सर्व व्यक्तींसाठी आपलें कांहींच कर्तव्य नाहीं काय ?
- आतां सरकार, न्यायपालिका वगैरेंनी हा प्रश्न योग्य प्रकारें सोडवावा ; आणि लवाटेंसारख्या अनेकांना ‘राहत’ द्यावी. आणि, वरील संस्था जर त्यासाठी दिरंगाई करत असल्या, तर, कुणाही व्यक्तीनें, व्यक्तिसमूहानें किंवा ‘एन्. जी. ओ. नें , ‘पी आय् एल्’ द्वारें आणि/ अथवा ‘चेंज्-ऑरगनायझेशन’ सारख्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणें गरजेचें आहे.
- माझ्यासारख्या अनेकांना इच्छा असूनही, वयाच्या आणि / अथवा शारीरिक अडचणींमुळे प्रत्यक्ष चळवळ उभारणें जरी कठीण असलें , तरी अशा ‘मूव्हमेंट्’ला सपोर्ट करणें तर नक्कीच शक्य आहे, तें आम्ही करूंच . सो, अॅक्ट् बिफोऽर इट् इज् टूऽ लेऽट . शुभास्ते पंथान: सन्तु .
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in
ICHCHHA-MARAN
Summary :
Ichchha-maran is not ‘Euthanasia’ ; it is ‘A Dignified Death, through one’s own free-will & decision’ .
‘Law’ is really about the relationship of an individual & the Society. It is not really about acts that do not affect the society.
We honour persons like soldiers, policemen etc, who willingly embrace Death.
We also respect Great personalities like Veer Sawarke & Acharya Vinoba Bhave, who embraced Death willingly through ‘Prayopveshana’. Similarly, we must honour ‘ordinary’ human beings who want to embrace Death willingly ; because they really are extra-ordinary !
For last 30 years, the old Lawate couple has been petitioning for the Right-to- ‘IchchhaMaran’, but in vain ! ! So, people like you-&-me should support their cause & make this a Movement , so as to build pressure & ‘persuade’ the Government and the Law-makers to enact a suitable Law soon.
–