नवीन लेखन...

न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

थिएटरचा इतिहास :

हे थिएटर न्यूयॉर्क शहरातील शुबर्ट संस्थेचे पन्नासवे ठिकाण आहे जे की त्यांचे जुने लिरिक थिएटर पुनर्स्थित करण्यासाठी बांधले गेले. वास्तुविद्याविशारद  हर्बर्ट जे. क्रॅप यांनी खास म्युझिकल थिएटर प्रॉडक्शनला सामावून घेण्यासाठी या थिएटरचे  डिझाइन केले आहे. हे  थिएटर २५ डिसेंबर १९२३ रोजी सर्वांसाठी खुले करण्यात आले. थिएटरमध्ये सगळ्यात पहिला प्रयोग ” मेरी जेन मॅककेन (Merry Jane McKane)”  नामक सांगितिक विनोदी नाटकाने झाली. या नाटकाच्या गाण्यांचे गीतकार विल्यम केरी डन्कनऑस्कर हॅमरस्टीन (दुसरे) हे होते. नाटकाला संगीत हरबर्ट स्टोथार्टव्हीन्सेंट युमन्स यांनी दिले होते. नाटकाचे निर्माते अर्थुर हॅमरस्टीन होते. 

या नंतर या थिएटरमध्ये अनेक सांगितीक कार्यक्रम झाले ज्यात अनेक दिग्गजांनी त्यांच्या कलेचे प्रदर्शन केले होते. त्यातील अ‍ॅनी, गेट युअर गन (१९४६), फिडलर ऑन दी रूफ (१९६४), ड्रीमगर्ल्स (१९८१), दी मिस्ट्री ऑफ एडविन ड्रॉड (१९८५), लेस मिसरेबल्स (१९९०) यांचे प्रयोग २००३ पर्यंत चालले. पुढे नोव्हेंबर २००८ साली बिली इलियट या म्युझीकल/ सांगितीक कार्यक्रमाचे थिएटरमध्ये प्रयोग सुरु करण्यात येऊन ते २०१२ सालपर्यंत चालू ठेवण्यात आले. हा सांगितीक प्रयोग २००१ साली प्रदर्शित झालेल्या बिली इलियट या चित्रपटावरुनच सुरु करण्यात आला होता.  

बॉक्स ऑफिस रेकॉर्ड :

१० टोनी पुरस्कार विजेते, वेस्ट एंड म्युझिकल बिली इलियट यांनी इम्पीरियल थिएटरसाठी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड गाठला. ३ जानेवारी २०१० रोजी संपलेल्या आठवड्यात आठ प्रयोगांमध्ये १,६६३,८९५ डॉलर इतकी प्रचंड कमाई केली गेली.

पत्ता : २४९ (W) ४५ वा पथ, न्यूयॉर्क, एनवाय (NY) १००३६, युनायटेड स्टेट्स
संपर्क टेलीचार्ज : (+) १ २१२-२३९-६२००

— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक) 

Imperial Theatre (2000-2001) House
Photo: Whitney Cox
Property of Shubert Archive

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..