नवीन लेखन...

मनावर ताण नाही; ताबा असणं महत्वाचं…

आपण नेहमीच शारीरिकदृष्ट्या स्वतःचा विचार करत असतो. अगदी अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीनही मुलभूत गरजा आपण केवळ शरीरासाठीच पूर्ण करत असतो, त्यासाठी अर्थार्जनाची जरुरी असते. त्यामुळे दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण ते मिळविण्यासाठी धडपडत असतो. पण मनाचा विचार खरंच आपण करतो का हो ? जरूर करतो, पण जसा, जितका मनाचा विचार आपल्याकडून व्हायला पाहिजे तितका होत नाही, हेही तितकंच खरं आहे. कदाचित मनाच्या विचाराकडे आपण गांभीर्यानं पाहत नाही. आपल्याच मनाचा मनातल्या मनांत, मनमुरादपणे, मनपसंद अथवा मन मारूनही आपण विचार करत नाही. कदाचित, शरीर दृश्य आहे, म्हणून त्याचा विचार आपण प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं करतो; मन मात्र अदृश्य असतं त्यामुळेच त्याच्याकडे अनावधानानं दुर्लक्ष होत असतं. मनाचा, शरीराचा मिलाफ झालेला असतो, किंबहुना तो असावा लागतो. आपले विचार मनांत प्रसूत होत असतात, त्यानुषंगानं आपण वर्तन करत असतो; ह्या दोन्हींच्या माध्यमातून आपले व्यवहार होत जातात. ह्याठिकाणी व्यवहार केवळ आर्थिकच नाही, तर दैनंदिन व्यवहार देखील आपल्या विचार, वर्तनावर अवलंबून असतात. खरं तर शरीर मनाच्या ताब्यात असतं. शरीर, शारीरिक हालचाली मनच नियंत्रित करत असतं; असं असूनही आपण मनाचा फारसा विचार करत नाहीत.

आपल्या अंतर्मनांत येणारे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. तसं करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेल्या गोष्टी बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्ग नियमानुसार ते गरजेचं असतं. आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणानं मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचं देखील जाणवतं. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचं निराकरण होत जातं. काहीवेळा उद्भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीनं मोकळेपणानं आपल्या मनांतील शंका व्यक्त करणं उपयुक्त ठरतं. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम, संभ्रमामुळे निर्माण होत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सारखी नसतात, प्रत्येकाचे प्रश्न निराळे असतात, उत्तरंही प्रत्येकासाठी भिन्न असतात. रबरी शिक्क्याचा वापर केल्यासारखी प्रत्येकवेळी उत्तरं बरोबर येत नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच, जसे ज्यांचे प्रश्न तशी त्यांच्यासाठी उत्तरे, हे लक्षात घेणं जरुरीचं असतं. एखाद्या समस्येचं उत्तर सर्वांनाच लागू होतं असं नाही, हेही समजून घेणं आवश्यक असतं.

कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.

विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..