माणसें बेजार हल्ली
वाढले आजार हल्ली .
देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी
मांडला बाजार हल्ली .
धर्म वेदी, माणसें अज
म्हणुन हा गोंजार हल्ली .
एक नुरला कार्यकर्ता
मात्र, नेते फार हल्ली .
लोपल्या पर्जन्यधारा
आसवांची धार हल्ली .
शत्रुची आतां न भीती
दोस्त करतो वार हल्ली .
माणसा माणूसकीचा
सोसवेना भार हल्ली .
‘भक्त‘ म्हणवत, जन विठूचा
टाळती शेजार हल्ली .
करत दो गोष्टी शहाण्या
मात्र जन दो-चार हल्ली .
अज : बकरा
— सुभाष स. नाईक
Leave a Reply