मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून कसा त्रास होत आलाय यावर चर्चा न झालेलीच बरी… पण आज आपल्या देशातील पुरूषच पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी ठरत आहेत. पण पुरूषांच्या या आत्मह्त्येना कोणी फारसा सहानुभूतीपूर्वक पाह्ताना दिसत नाही. माध्यमेही त्यात मागे नाहीत. आजही आपल्या देशात स्त्री-पुरूष समानतेच वार कितीही जोरात वाह्त असल तरी आपल्या देशात आजही पुरूषप्रधान संस्कृतीच घट्ट पाय रोवून उभी आहे. काही बाबतीत आपल्या देशातील स्त्रियांनी पुरूप्रधान संस्कृतीचा स्वतःच स्विकार केल्याचेही स्पष्टपणे जाणवते.
आपल्या देशात बलात्कार विनयभंगासारखे प्रकार फक्त पुरूषांकडूनच स्त्रियांच्या बाबतीत घडतात हा विचारही घट्ट रोवला गेलाय. एखाद्या स्त्रिचा पुरूषाला धक्का लागला तर तो ते फारस मनावर घेत नाही. पण तोच धक्का परूषाचा चुकून जरी स्त्रिला लागला तर पुरूष नालायकच ठरतो. देशातील लोकसंख्या दिवसेन दिवस वाढतेय त्याच बरोबर बेकारी आणि महागाईही दिवसेन दिवस वाढतेय ! अशात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक जबाबदारी उचलण काही पुरूषांना नाही शक्य होत. म्ह्णून ते पुरूष कुचकामी नसतात पण त्यांच्या मनावर सतत होणारा आघात आणि वाढत जाणारा मानसिक दबाव त्यांना आत्मह्त्येस प्रवृत्त करत असावा. तर काही विवाहीत परूषांच्या बाबतीत त्याच्या पत्नीकडून केल्या जाणार्या अवास्तव मागण्या ज्या दागदागिने, घर – मोटर, कपडालत्ता याच्याशी संबंधीत असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ असणारे पुरूष रोजच्या टोमण्यांचा मारा सह्न न झाल्यामुळेही आत्महत्ते सारख्या मार्गाला जवळ करत असावेत. आज आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरूषच बळी ठरत आहे. आपल्या देशातील विवाहीत पुरूषांच्याच आत्मह्त्येच प्रमाण दिवसेन- दिवस वाढत जाण्याची शक्यताच अधिक दिसतेय. समाजात अनैतिक संबंधाच प्रमाणही भरमसाठ वाढतय. आपल्या पत्नीचे कोणा परक्या पुरूषासोबत अनैतिक सबंध आहेत हे कळल्यावर आपल्या पुरूषत्वाबद्दल लाज वाटल्यानेही काही पुरूष आत्महत्येचा मार्ग स्विकारत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येची ही सखोल चौकशी व्हायला ह्वी…तरच त्या रोखण्यासाठीचा उपाय सापडण्याचा मार्ग सुखकर होईल.
— निलेश बामणे
Leave a Reply