पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात.
मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास.
काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं ‘झेडकेज’ही आहे.
मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा कारखाना.
इंडीपेंडन्स मधे बियर बनवली जाते आणि बफे बरोबर सर्व्ह केली जाते.
इथलं वैशिष्ट्य हे, की इथे आठ प्रकारच्या बियर मिळतात.
तुम्हाला फारशी प्यायची सवय नसेल, तर तुम्ही फक्त शंभर रुपयात (taxes extra) इथल्या वेगवेगळ्या बियर्स ट्राय करून पाहू शकता.
याला म्हणतात ‘बियर फ्लाईट’ !
‘बियर फ्लाईट’ म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियर्स ३० एमएल मापात आणून दिल्या जातात.
डावीकडून उजवीकडे एक ते आठ अशा क्रमाने ग्लासेस ठेवले जातात.
सगळ्यात डावीकडे एकदम लाईट बियर. सगळ्यात उजवीकडे डार्क. डावीकडून उजवीकडे बियर्स डार्क होत जातात. नंबर चार म्हणजे बाहेर कॉमनली मिळणारी रेग्युलर लागर.
शंभर रुपयात फक्त आठ टाईप चे ३० एम एल प्रत्येकी. (एकूण २४० एम एल)
यानंतर,पूर्ण भरलेल्या ग्लास प्रमाणे पैसे देऊन आपण, जी आवडेल ती निवडून पिऊ शकतो.
या आठ बियर्स खालीलप्रमाणे –
१. हनी लव्हेंडर एल – मध आणि लव्हेंडर याच्या मिश्रणापासून बनलेलं एल. सुंदर लागतं. बडलाईट लाईम बियर सारखं.
२. रासबेरी पाय – ब्रूइंग करताना भरपूर प्रमाणात रासबेरी घालून बनवलेली चक्क गुलाबी रंगाची बियर !
३. बेल्जियन विट – ओट, पिल्सनर बियर, गहू याच्या मिश्रणापासून बनवलेली बियर. याला संत्र्याचं साल आणि कोथिंबिरीचा हलकासा स्वाद असतो.
४ फोर ग्रेन सीझन – बार्ले, गहू,राय आणि ओट हे यीस्ट घालून फरमेंट केलं जातं. याला प्लम आणि पेअरचा प्रॉमिनंट स्वाद असतो.
ही बियर बाहेर कुठेही मिळणाऱ्या लागर बियर सारखी लागते.
५. बेल्जियन डबेल – ही पण जवळपास फोर ग्रेन सीझनचीच बहीण. यात थोडासा गूळ वापरलेला असतो.
६. इक्सककाओ – कोकोच्या बिया आणि बोरबॉन व्हॅनिला घालून ही बियर बनवली जाते.
७. अॅव्हेगेडॉन – व्हाईट IPA म्हणजे बियर ब्रूइंग करतानाच्या विशिष्ट अमेरिकन आणि बेल्जियन पद्धतीचं मिश्रण. या व्हाईट आयपीए मधे होप्स मिसळले जातात. ही किंचित गोड पण मुख्यत्वेकरून कडूझार असते.
८. मेथड टू मॅडनेस IPA V१.० – तमाम वूडी, सायट्रस, फ्लोरल आणि फ्रूटी अशा सगळ्या स्वादांचं मिश्रण करून बनवलेली माल्ट आय पी ए.
भयंकर कडू. जीभ एकदम ठार होते 🙂
जर तुम्ही बफे विथ ड्रिंक्स घेतलात तर, तुम्हाला वर वर्णन केल्याप्रमाणे ‘बियर फ्लाईट’ तर मिळतेच. पण सोबत कुठलीही बियर, स्टार्टर्स आणि मेन कोर्स अनलिमिटेड मिळतो.
जर तुम्ही वेगन असाल, ड्रिंक्स घेऊ इच्छित नसाल तर तुमच्याकरता व्हेज स्टार्टर आणि मेन कोर्स असतोच.
फूड क्वालिटी आणि व्हरायटी उत्तम आहे.
बियर आवडणाऱ्या लोकांना इथे प्रचंड व्हरायटी मिळेल.
मला स्वतःला रासबेरी आणि इक्सककाओ या बियर्स त्यांच्या वेगळेपणा मुळे प्रचंड आवडल्या.
सवय अजिबात नसल्याने तीन ग्लासच्या वर पिऊ शकलो नाही 🙂
याचं जरा वाईट वाटलं 🙂
याशिवाय, या बियर्स बनत असताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.
स्टीलचे छानदार व्हेसल्स इथे आहेत. बारले, होप्स आत टाकताना तुम्ही पाहू शकता. मॉनिटर वर रिअॅक्टर्स मधे आत काय चाललंय ते पाहू शकता. गम्मत वाटते. एकदा मजा म्हणून जायला हरकत नाही.
लाईट बियर्सच्या चाहत्यांना रासबेरी बियर होल-हार्टेडली रेकमेंडेड.
— From WhatsApp. I liked this so hared with you. I do not know the original author.
Leave a Reply