चुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता
आपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या या अतिफैलावाला आपल्या टिव्ही वाहिन्या , आपली समाजमाध्यमे आणी आपण सर्व जबाबदार आहोत. समाजमाध्यमां बरोबर मुख्य प्रवाहातील बहुतेक माध्यमेही वाहावत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा दुषपरिणाम आता समोर येत आहे.असे वाट्ते की टिव्ही वाहिन्यांचे प्रासारावर बंदी आणुन त्यांना दिवसातुन २-३ तासच प्रसारण करु द्यावे.समाजमाध्यंमावर पहिल्या १० मेसेजेस नंतर प्रत्येक जास्तीच्या मेसेजेसवर ५ रुपये करोना कर लावावा.करोनावर मात केल्यानं तर हा कर काढायचा की नाही यावर पुनर विचार करता येइल.जास्त सोपे म्हणजे सोशल मिडियावरच कर लावा,जितके जास्त अकाऊंट तेवढा जास्त कर.
एखादी गोष्ट फुगवून सांगणे हे सध्याच्या समाजमाध्यमी जगात नित्याचेच झाले असल्याने या माहितीच्या महापुरात सत्य काय आणि असत्य काय, हे समजणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ही ‘चुकीच्या माहितीची साथ’ कशी रोखाण्याकरता हे मोठे पाउल उचलावेच लागेल.
करोना व्हायरसला चीनी व्हायरस म्हणा
करोना व्हायरसला चीनी हे नाव दिले पाहिजे.जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे मध्यवर्ती स्थान आणि चिनी प्रवाशांचा जगभर होणारा संचार तसेच वन बेल्ट, वन रोड या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी गुंतलेले लाखो कामगार यांमुळे करोना जगभर फैलावला, हे चीनने पुर्ण जगाविरुध्द चालवलेले तिसरे महायुध्दच समजले पाहिजे.करोना विषाणूमुळे जग एकाचवेळी साथीच्या आजाराच्या आणि मंदीच्या विळख्यात सापडले आहे. जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एका अंदाजाप्रमाणे करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल २ ट्रिलियन डॉलरचा फटका बसू शकतो. या करता चीनला जगाचे झालेले नुकसान भरपाई करण्यास भाग पाडले पाहिजे.या करता मित्र देशांची मदत घेउन चीन विरुध्द नुकसान भरपाइ करता आघाडी ऊघडली जावी.मात्र भारतातिल काही माध्यमे चीन या करता कसा जबाबदार नाही असे मानसिक युध्द खेळत आहेत.त्यांना जाब विचारण्याची गरज आहे.
चीननंतर करोनाने इटलीला आपला घट्ट विळखा घातला आहे. त्यानंतर चीनने इटली आणि इतर करोनासंकटग्रस्त देशांनाही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. चीनी मानसिक युध्दमुळे चीन जगभर आपला प्रभाव वाढवणार का? करोना आजारावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, त्यामागची सत्यासत्यता तपासण्याला वेळ लागेल. असे अनेक प्रश्न भविष्यातील उत्तरांची वाट पाहत उभे आहेत.ही सर्व अनिश्चितता बराच काळ चालणार आहेत.
नेपाळात करोनाचे संशयित सापडले
दक्षिण आशियाचे भवितव्य मात्र भारताशी जोडले गेले आहे. करोनाच्या साथीवर आपण कसे नियंत्रण मिळवतो यावर दक्षिण आशियाई देशांची भवितव्य अवलंबून आहे. भारताने करोना फैलाव रोखण्यासाठी देशाला जगापासून विलग करण्याचे धोरण अवलंबले आहे. विलगीकरणाचे धोरण म्हणून भारताने सरकारने परदेशाची विमान सेवा थांबवली आहे. मात्र, भारत नेपाळ, आणी भारत बंगलादेश जमीनी सिमांचे काय?
आम्ही ‘करोनामुक्त’ आहोत, असे सांगणा-या नेपाळात करोनाचे संशयित सापडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारताने नेपाळ-भारत सीमेवर अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमार्गे करोना विषाणून भारतात शिरू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तज्ज्ञांचे पथक सीमेवर तैनात करण्यात आले आहे. देशावर आलेल्या नैसर्गिक संकटाबरोबरच रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक अशा सर्व संकटांचा मुकाबला करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हे पुरेसे नाही.
भारताने भारत नेपाळ सीमा सील केल्यापासून भारतामध्ये येणारे हजारो नेपाळी नागरिक हे धरचुला या सीमेवरती असलेल्या गावामध्ये अडकलेले आहेत. एवढेच नव्हे तर नेपाळच्या मीडिया रिपोर्ट प्रमाणे अनेक क रोना ग्रस्त चिनी नागरिक आपल्या कामाच्या जागे पासून गायब झाले आहेत. ते एक मोठा धोका आहे आणि त्यांना शोधणे गरजेचे आहे.चीन भूसीमांच्या काही ठिकाणांवर नेपाळ सरकारने वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहे.जे अर्थातच पुरेसे नाही.
भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.
नेपाळला उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत
नेपाळमध्ये य़ाआधी विमानतळांवर कोणत्याही प्रकारची चिकित्सा होत नव्हती. चीनमध्ये जेव्हा करोनाने डोके वर काढले होते तेव्हाही नेपाळ-चीन हवाई सेवा बिनदिक्कतपणे सुरू होती. तसेच नेपाळ-चीन सीमांवरही कोणत्याही प्रकारची तपासणी केंद्रे स्थापन करण्यता आलेली नव्हती. त्यामुळे करोनाचा नेपाळमध्ये प्रवेश झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने आखातात तसेच इतर देशांत वास्तव्यास असलेल्या नेपाळी नागरिकांना करोनाने ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नेपाळला करोना प्रादुर्भाव होण्याची उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत सूचिबद्ध केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या इशा-यानंतर खडबडून जाग्या झालेल्या नेपाळने फ़क्त काही दिवसापुर्वी करोनाविरोधातील लढाई सुरु केली आहे. काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी कक्ष उभारण्यात आले असून देशात येणा-या आणि देशातून बाहेर जाणा-या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर हजारो नेपाळी नागरिकांनी चीनमध्ये करोना प्रभाव वाढल्या नंतर नेपाळ मधून भारतामध्ये प्रवेश केला आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर अश्या सगळ्या नागरिकांची ज्यानी नेपाळ मधून भारतामध्ये वेगवेगळ्या कारणाकरता प्रवेश केला त्यांची करोनाकरता मेडिकल टेस्ट होणे गरजेचे आहे.नाहीतर नेपाळ च्या द्वारे करोना मोठ्या प्रमाणामध्ये भारतात प्रवेश करेल.
अनेक नेपाळी नागरिक भारतात येण्याची शक्यता
मात्र नेपाळने यंदाच्या वर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिजिट नेपाळ इयर २०२०’ हा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो पर्यटक नेपाळमध्ये येऊन त्याचा मोठा फायदा नेपाळच्या अर्थव्यवस्थेला होणार होता. मात्र, करोनाच्या साथीमुळे नेपाळ सरकारला हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये नेपाळला येणा-या परदेशी पर्यटकांच्या संख्येत २१ टक्क्यांनी घट झाली आहे. नेपाळला भेट देणा-या परदेशी पर्यटकांमध्ये चिनी नागरिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. २०१९ मध्ये नेपाळला भेट देणा-या चिनी पर्यटकांची संख्या १,६९,५४३ एवढी होती. ती यंदा ३,५०,००० पर्यंत पोहोचणार होती. मात्र, ही संख्या घटल्याने नेपाळच्या पर्यटन उद्योगाने हाय खाल्ली आहे.करोना मुळे पर्यटन उद्योग सुधारण्याची शक्यता पुढच्या काही महिन्यात दिसत नाही.
करोनाच्या भीतीमुळे नेपाळची देशांतर्गत विमानसेवाही कोलमडली आहे. करोनाचा एवढा वाईट परिणाम हवाई वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे की, नेपाळमधील अनेक विमानतळांवर विमाने धावपट्ट्यांवरच उभी असल्याचे चित्र आहे.
करोनाची कोंडी करण्यासाठी कतारने नेपाळसह १४ देशांच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्यामुळेही नेपाळच्या अडचणींत भर पडली आहे. कतारमध्ये नोकरी करणा-या नेपाळींची संख्या जास्त आहे. कतार सरकारच्या निर्णयामुळे सुमारे ४० हजार नेपाळी कामगारांना नेपाळमध्ये अडकून पडावे लागणार आहे.
आशियाई विकास बँकेच्या अंदाजानुसार करोना विषाणूमुळे नेपाळच्या देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १३ टक्के घट होण्याची आणि हजारो लोकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे.म्ह्णुन हे नेपाळी नागरिक मजदुरीकरता भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या सगळ्या घट्नांवर व त्यामुळे भारतात येणार्या नेपाळी नागरिकांवर लक्ष ठेवावे लागेल.
राजधानी काठमांडूमध्ये तर सॅनिटायझर्स, मास्क आणि इतर महत्त्वाची औषधे इत्यादींचा प्रचंड तुटवडा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत त्यांना सॅनिटायझर्स, मास्क, इतर महत्त्वाची औषधे,जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करुन करोनावर मात करण्यास मदत करु शकतो. भारताच्या नेतृत्वाखाली नेपाळसारख्या दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन करोनाच्या संकटाला तोंड द्यायला हवे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply