नवीन लेखन...

पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज

पाकिस्तान मध्ये  चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा

भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लढत असताना पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येत असल्यावरून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी तीव्र शब्दांत निंदा केली. या कठीण प्रसंगातही पाकिस्तानने आपल्या वृत्तीत किंचितही बदल केलेला नाही.

जनरल नरवणे म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे जगातील सगळेच देश या विषाणूविरोधात लढा देत आहेत. पण पाकिस्तानने याही स्थितीत आपल्या कारवाया करणे सुरूच ठेवले आहे. या कठीण प्रसंगात भारत जगातील इतर देशांना वैद्यकीय स्वरुपाची मदत करतो आहे. औषधे, वैद्यकीय साधने निर्यात करण्यात येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून दहशतवाद निर्यात करण्याचे काम वेगाने सुरूच आहे.काश्मीर खोऱ्यातील केरान भागात पाच एप्रिलला झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पण यावेळी पाच जवान शहीदही झाले होते. दहशतवादी घुसखोरी करून भारतात शिरण्याच्या प्रयत्नात होते.

कोरोना पसरवण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट

भारतात कोरोना पसरवण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आला आहे.नेपाळमधील परसा जिल्ह्यातील जग्गनाथपूर गावातील रहिवासी ‘जालिम मुखिया’ याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठविण्याच्या तयारीत आहे. जालिम मुखिया याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध आहे. भारतात बनावट नोटा आणि अमली पदार्थ पोहोचविण्यात त्याचा हात होता.

सर्वत्र चिनी करोना विषाणूचा उद्रेक झाला असताना धार्मिक मेळाव्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात पाकिस्तानातील ५० हून अधिक ज्येष्ठ धर्मगुरूंच्या गटाने सरकारला १४/०४/२०२० ला इशारा दिला आहे. अल्लाला क्षमा मागण्यासाठी अधिक उपासकांना मशिदीत जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, असे वृत्त ‘डॉन न्यूज’ ने दिले.

पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159  पर्यंत गेला आहे.  अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे.

वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा विविध देशांनी तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना सोडवून परत आणले होते. याला अपवाद होता पाकिस्तानचा. सुमारे ८०० पाकिस्तानी वुहान आणि ह्युबै भागात शिकत आहेत. आपल्याला विशेष विमानाने परत आणावे, यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या सरकारकडे कळकळीची विनंती केली. पण आर्थिक चणचणीमुळे विशेष विमान धाडणे परवडेना, यामुळे पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडले.

पाकला चिनकडुन चिनी करोना विषाणू देणगी

अपुरे वैद्यकीय मनुष्यबळ, सोयीसुविधांचा अभाव आणि त्यातच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तान या संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ नाही. चीनच्या देशांतर्गत हालचाली हा चिंतेचा विषय आहे. कारण, पाकिस्तानचे चीनशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध आहेतच, यानिमित्ताने खूप मोठी चिनी लोकसंख्याही पाकिस्तानात स्थायिक झाली आहे. त्यांच्या चीनमधील प्रवासामुळेही कोरोनाचा धोका आणखीन वाढत आहे.त्यामुळे चिनी करोनाने सर्वाधिक त्रस्त देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे.

इराणमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश

पाकिस्तानात चिनी कोरोनाचा प्रसार झाला सौदी अरेबियातील मक्केला तसेच इराणमधील मशाद आणि कोमसारख्या ठिकाणी तीर्थयात्रांना जाऊन परत आलेल्या लोकांमुळे. पाकिस्तानमध्ये सुमारे ९५९ किमीची सीमा असून दरवर्षी एक लाखांहून अधिक पाकिस्तानी तीर्थयात्रेसाठी इराणला जातात.

पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की,  इराण सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा सिंधमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. इराण सीमेवरून पाकिस्तानात दाखल होणार्या नागरिकाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काही काळ त्यांना सीमेवरील विलगीकरण शिबिरात थांबवून नंतर त्यांच्या त्यांच्या प्रांतात सोडण्यातही आले, तर काही जणांना पाकिस्तानातच चिनी कोरोनाच्या निदान आणि उपचारासाठी स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या कक्षात संशयितांची योग्यप्रकारे कोरोना चाचणीही करण्यात आली नाही आणि त्यावर उपचारांचाही अभाव दिसून आला. सोशल मीडियावर पाकिस्तानातील विलगीकरण कक्षातील काही व्हिडिओही व्हायरल झाले. या रुग्णांना चक्क तंबूत ठेवले जात असून तिथे स्वच्छतागृह, शौचालयाच्या मूलभूत सुविधेचाही अभाव आहे. काही संशयितांना चक्क सरकारी इमारतींच्या फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये वाढण्याची शक्यता

पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर पाकिस्तानात ९ लाख, ७५ हजार, ६३४ हून अधिक नागरिकांनी देशात प्रवेश केला. असंरक्षित पश्चिमी सीमा, मरणासन्न अवस्थेत असलेली रुग्णालये आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या अशिक्षित लोकसंख्येने कोरोनाच्या महामारीत अधिकच भर घातली आहे.

मोठ्या प्रमाणात शरणार्थींची ये-जा,  शिया तीर्थयात्रींचा इराणमधील प्रवास, वाढती तस्करी आणि कामाच्या शोधार्थ पाकिस्तानात इतर देशांमधून दाखल होणारे नागरिक यांसारख्या कारणांमुळे कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये कैकपटीने वाढत आहे.

आधीच कंबरडे मोडलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था ,गगनाला भिडलेली महागाई आणि त्यात कोरोनाच्या भीतीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे पाकिस्तानी जनतेसमोर जगण्याचे संकटच उभे ठाकले आहे. कोरोनाच्या या भीषण महामारीनंतर चीनमध्येही उद्भवणार्या मंदीच्या लाटेचा तडाखा पाकिस्तानलाही बसण्याची शक्यता आहे.

अल्पसंख्याक हिंदूं ख्रिश्चनांना रांगेतून बाहेर काढल्याची घटना

पंतप्रधान इमरान खान यांनी टेलिव्हिजनवरील राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात चीनप्रमाणे कर्फ्यू लावण्याचा पाकिस्तान विचारदेखील करू शकत नाही, याची कबुली दिली. देशातील २५ टक्क्यांहून जास्त जनता दारिद्य्ररेषेखाली असून त्यांना आर्थिक मदत पुरवणे पाकिस्तानसाठी अवघड आहे. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ची जबाबदारी इमरानने जनतेच्याच गळ्यात मारली. पाकिस्तानात मास्क, व्हेंटिलेटर्स आणि अन्य सुरक्षा उपकरणांचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात जेमतेम २२०० व्हेंटिलेटर्स असून त्यात दीड कोटी लोकसंख्येच्या बलुचिस्तानमध्ये अवघे ४९ व्हेंटिलेटर्स आहेत. जर मुसलमानांमध्येच प्रांत आणि पंथानुसार भेदभाव असेल तर अल्पसंख्याक हिंदूंची काय कथा?

कराचीमध्ये गरिबांना रेशन वाटणार्‍या एका धर्मादाय संस्थेने हिंदूंना रांगेतून बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.

या परिस्थितीत साहजिकच देशातील सर्व नागरिकांना, मग ते कुठल्याही धर्माचे का असेना, पूर्ण मदत मिळणे अपेक्षित. पण, सिंध प्रांतातील कराचीत मात्र सरकारी रेशनच्या दुकानावर हिंदू आणि ख्रिश्चनांना साफ मदत नाकारण्यात आली. का? तर ते पाकिस्तानचे नागरिक असले तरी शेवटी सरकारच्या लेखी दर्जा कायमच दुय्यम. अशा कठीण समयी अल्पसंख्याकांशी अशाप्रकारच्या द्वेषपूर्ण, भेदभावजनक वागणुकीबद्दल अमेरिकेनेही पाकचे कान उपटले आहेत. परंतु, या सर्वाचा कुठलाही परिणाम पाकिस्तानवर होईल, याची शक्यता नाहीच.

त्यामुळे बाहेरील देशाकडून आर्थिक मदतीसाठी पदर पसरविणार्‍या इमरान खान यांची ही मदत केवळ मुसलमानांसाठीच आहे का, असा प्रश्न आहे. खान यांनी कोरोनाशी लढ्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून पाकिस्तानवरील कर्जे माफ करण्याची मागणीही केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडेही अर्थसाहाय्यासाठी पाकिस्तान डोळे लावून आहेच. पण, जर ही मदत पाकिस्तानातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांपर्यंत पोहोचणारच नसेल, तर ?

आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला सढळ हस्ते मदत करण्यापूर्वी ही मदत अल्पसंख्याकांपर्यंतही पोहोचेल, याची आधी खातरजमा करुन मगच ती जाहीर करावी. पाकिस्तानकडून या मदतीच्या पै अन् पैचा हिशोब घ्यावा, जेणेकरुन या मदतीनिधीचा वापर हा देश दहशतवादी कारवायांना बळकटी देण्यासाठी तर करत नाही ना, याची पुष्टी होईल.

भारत नेपाळ,भारत पाकिस्तान सिमा सिल करा

पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज आहे आणि आपल्या जमिनी सीमा जास्त चांगल्या पद्धतीने सील करण्याची गरज आहे.पाकिस्तान इराण आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सिमांप्रमाणे भारत बांगलादेश आणि भारत नेपाळ सीमा खुल्या आहेत. नेपाळच्या सीमेवरून रोज अक्षरशः हजारो नागरिकांची नेपाळ मधून भारतामध्ये आणि भारता मधून नेपाळमध्ये वेगवेगळ्या कारणांकरता हालचाल होते. जशी एअरपोर्ट वरती चिनी करोनाकरता चौकशी केली जाते तशी जमिनी सीमांवर केली जात नाही. हे अर्थातच भारता करता धोक्याचे आहे.भारत नेपाळ,भारत पाकिस्तान भारत बांगलादेश सिमा सिल करा.

पाकिस्तान सरकार अल्पसंख्याक धर्मीय आणि अल्पसंख्याक पंथियांचे रक्षण करू शकत नाही.अशा घटनांमुळे भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची किती गरज आहे हे समोर येते.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

1 Comment on पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज

  1. हेमंत सरांचे लेख वाचनीय,अभ्यासपूर्ण असतात.खूपच छान माहिती मिळते.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सैन्य नीती सोप्या शब्दात समजते

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..