भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे.
मी स्वतः इंग्लंड, अमेरिका आणि सर्व स्कॅन्डीनेव्हियन देशांमध्ये भरपूर प्रवास केला आहे. वास्तविक ह्या देशांमधील खाण्यापिण्याच्या सवयी पहिल्या तर आपल्यापेक्षा जास्त गोड पदार्थ त्यांच्या जेवणात असतात. तरीदेखील भारताला मधुमेहाचा हा शाप का?
ह्याविषयी सर्वात मुख्य लक्षात आलेला मुद्दा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा. ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अगदी न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये पण ९०% हॉटेल्स रात्री ९ वाजता बंद होतात. भारतात कोणी रात्री ९ वाजता हॉटेल बंद केलं तर बिचारा हॉटेल मालक नक्कीच उपाशी राहील.
प्रत्येक घरात रात्रीच्या जेवणाची वेळ ही साधारण संध्याकाळी ७ च्या आसपास असते. भारतातील, खासकरून शहरी भागांतील जीवनपद्धतीनुसार ९०% लोकं रात्री १० नंतरच जेवतात.
जेवणानंतर २ तासांच्या वेळेला कफाचा अवस्थापाक काळ म्हणतात. ह्या काळात झोपण्याने कफाचे रोग होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
अनुवंशिकता असेलही, पण ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतातील काही धर्मांत सूर्यास्तानंतर अन्नपाणी घेत नाहीत. ह्या नियमाचे पालन करणाऱ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण किती टक्के आहे ह्याचा अभ्यास करायला हवा.
— डॉ. संतोष जळूकर
Leave a Reply