१९८३ सालची विश्वचषक स्पर्धाही प्रुडेन्शियल ॲश्यूरन्स कंपनीने प्रायोजित केल्याने तिसरा विश्वचषकही प्रुडेन्शियल विश्वचषक म्हणून ओळखला जातो. आयसीसीने सलग तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचा मान इंग्लंडला दिला. या विश्वचषकाने फक्त भारतीय क्रिकेटलाच कलाटणी दिली नाही तर, क्रिकेटला एक नवा जगज्जेता मिळवून दिला, तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचा दबदबा कमी केला.
१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली.
या विश्वचषकातही आठ संघांनी सहभाग घेतला. चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली.
१९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकासारखेच या स्पर्धेचे स्वरुप होते फक्त साखळी फेरीत प्रत्येक गटातील संघांचे परस्पराविरुध्द दोन सामने झाले. याआधीच्या विश्वचषकात प्रत्येक गटातील संघ परस्पराविरुध्द एकच सामना खेळला होता. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्यफेरीत आणि उपांत्यफेरीतील विजेते अंतिम फेरीत असे या स्पर्धेचे स्वरुप होते. या स्पर्धेत आयसीसीचे कायमस्वरुपी सदस्य सात संघ होते तर १९८२ आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून झिंम्बावे विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply