नवीन लेखन...

भारतीय बुद्धिबळपट्टु प्रवीण ठिपसे

ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपट्टु प्रवीण ठिपसे यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५९रोजी झाला. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.

प्रवीण ठिपसे यांचे वडील डॉ. महादेव ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढय़ासाठी १० वर्षे दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीण यांच्या आईनी आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही मुलं खेळायचा आग्रह करत. मोठे बंधू अभय यांना खेळाचं तांत्रिक ज्ञान अवगत होतं आणि शिकवण्याचं कौशल्यही.

बुद्धिबळाचे क्लिष्ट धडे ते अत्यंत सोप्या शब्दात धाकटय़ा दोघा भावांना देत. त्यांची ही हातोटी बघून पुढे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षणासाठीचा मानाचा ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार’ देऊन गौरवले होते. आईकडून प्राथमिक धडे घेतल्यावर प्रवीण ठिपसे यांनी सहा-सातव्या वर्षीच वेगवेगळ्या शालेय स्पर्धा खेळायला सुरुवात केली.

आईची एक आठवण सांगताना म्हणतात. ‘‘१९७० मध्ये मी आठवी-नववीत असताना आमच्या शाळेने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याविषयी अनास्था दाखवल्याने आईने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन दादासाहेब रेगे यांना जाऊन भेटली. परिणामी १९७२-७३ आणि १९७३-७४ या दोन्ही वर्षी बुद्धिबळाचा आंतरशालेय करंडक ‘बालमोहन’कडे आला आणि त्यानंतरही पुढची तीन वर्षे प्रवीण ठिपसे यांचा धाकटा भाऊ सतीश यांनी तो शाळेकडेच राखला.

आंतरशालेय करंडक जिंकल्यामुळे रामचंद्र सप्रे, श्रीकृष्ण साखळकर, अरुण वैद्य, सुरेश शाळिग्राम, अविनाश आपटे.. अशा महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचं लक्ष प्रवीण ठिपसे यांनी वेधून घेतलं. त्यानंतर या दिग्गजांचा खेळ बघत, त्यांच्या चर्चा ऐकत या एकलव्याची साधना सुरू झाली आणि त्याने एक-दोन वर्षांतच प्रथम राज्य व नंतर राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केली. संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणारी १९७४ मधली एक घटना प्रवीण ठिपसे यांच्या जीवनात घडली.

बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५. हा खेळ बघणाऱ्या डॉ. सव्‍‌र्हेयर या महान खेळाडूने त्याच वेळी भविष्य वर्तवलं की, एक ना एक दिवस हा मुलगा ग्रॅण्डमास्टर होईल. त्यांचे हे बोल १९९७ साली खरे ठरले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बुद्धिबळ ऑलम्पियाड, एशियन टीम चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा प्रवीण ठिपसे यांचा सिलसिला सुरू होता. बुद्धिबळातील पराक्रमामुळे १९ व्या वर्षी छत्रपती पुरस्कार, २३व्या वर्षी अर्जुन पुरस्कार आणि पंचविशीच्या आतच ग्रॅण्डमास्टर किताबासाठी पहिला परफॉर्मन्स असा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. प्रवीण ठिपसे यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे या महिला इंटरनॅशनल मास्टर आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..