
भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा, या साठी केंद्र सरकारने ४ जुलै १९६६ रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय उपचार पूर्ण झाल्यावर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी काऊंसिलचे काम विधिवत सुरू झाले. म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा होऊ लागला.
ही प्रथा गेली ५१ वर्षे चालू आहे. हिकीचे ‘बेंगॉल गॅझेट’ हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कलकत्यात १७८० मध्ये सुरू झाले. त्यानेच भारतात पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.
गेल्या दोन शतकांत भारतातील पत्रकारिता तंत्रज्ञान व गुणवत्तेत खूप विकसीत झाली. हा विकास एका दिशेने व वेगात व्हावा म्हणून प्रेस काऊंसिल स्थापन झाले खरे, पण ते कधीही परिणामकारक ठरले नाही. पत्रकारितेने गुणात्मक विकास करायचा तर तो सरकार नियंत्रित यंत्रणेमार्फत नव्हे तर पत्रकारांच्या संस्था व संघटनांकडूनच होऊ शकतो. मात्र त्यासाठी पत्रकारांचे ऐक्य हवे.
आजच्या दिना निमित्त देशातील सर्व पत्रकारांचे अभिनंदन.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply