नवीन लेखन...

भारतीय रेल्वे आणि संगणकीकरण

भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता ‘इ’ रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे.

रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पी.आर.एस.) म्हणतात. याकरता लागणारं सॉफ्टवेअर ‘क्रिस’ (सी.आर.आय.एस.) पद्धतीचं असून, याकरता भारतभर पाच डाटा सेंटर्स (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद) आहेत. त्यांचे सगळे सर्व्हर्स एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतभरातून कुठूनही कुठल्याही विभागातील गाडीच्या तिकिटाचं आरक्षण मिळतं. याकरता रेल्वेचे १० विभाग केलेले आहेत. ही भारतीय रेल्वेची सर्वांत अद्ययावत संगणकीकरणप्रणाली असून, त्यासाठी भारतीय रेल्वेला २००९ सालातील ‘वेबरत्न प्लॅटिनम आयकॉन अॅवॉर्ड’ मिळालेलं आहे; तसंच १९९९ सालात ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’ यांचं ‘बेस्ट आयटी यूजेस’बद्दल बक्षीस मिळालेलं आहे.

क्रिस प्रणाली अंतर्गत जवळजवळ ३५ विभागांकरता सॉफ्टवेअर्स वापरलेली आहेत. त्यामुळे तिकीटआरक्षण, तिकिटावर दिसणाऱ्या सर्व बाबी, गाड्यांचं टाईम टेबल, गाडी कुठे आहे, इंजिनं, मालगाडीचे डबे, यार्ड्स, प्रत्येक डब्यावरील प्रवाशांच्या नावांचे चार्ट्स, तिकिटांचं कॅन्सलेशन, वेट लिस्ट व रोज प्रत्येक टर्मिनलला जमणारे पैसे, अशा अनेक गोष्टींची माहिती संगणकावर मिळू शकते SATSANG Software रेल्वे टाईम टेबल व गाडीची येण्याची जाण्याची वेळ या करता वापरलं जातं. ‘इंटिग्रेटेड मल्टिप्लाय ट्रेन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम’ (आय.एम.टी.पी.आर.एस.) द्वारे आता मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून प्रवाशांना ते प्रतीक्षा यादीत आहेत किंवा त्यांचं तिकीट नक्की झालं आहे हे कळू शकणार आहे, याकरता आता इंटरनेट उघडण्याची गरज पडणार नाही. क्रिस, सी.एम.सी., आय.एम.टी.पी. आर. एस. (concert are based on 3- Tier server client architecture with Mesh Type Topology) या अद्ययावततेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणली गेलेली आहे. सर्वसाधारण प्रवाशाला कळू शकेल अशा सुधारणा रोजच्या रोज केल्या जात आहेत. या यंत्रणेत अकस्मात बिघाड होऊ नये म्हणून ‘स्ट्रक्चरल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी’ अर्थात ‘रचनात्मक आपत्कालीन व्यवस्थापन धोरण’ अमलात आणलेलं असून, फिजिकल डिझास्टर अर्थात शारीरिक आपत्तीपासूनही संरक्षण देण्याची यंत्रणा आहे. १०० टक्के सुरक्षित यंत्रणेकरता ज्या काही त्रुटी आहेत त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या क्रांतीमुळे रांगेत उभं राहून तिकिटं काढण्याचा जुना कंटाळवाणा प्रघात आता इतिहासजमा झाला आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..