विजय अमृतराज यांचा जन्म १४ डिसेंबर १९५३ रोजी चेन्नई येथे झाला.
विजय अमृतराज यांची आई मॅगी आणि वडील रॉबर्ट अमृतराज होत. विजय अमृतराज हे ग्रासकोर्ट खेळाडू होते. विजय अमृतराज आणि त्याचे धाकटे भाऊ आनंद आणि अशोक विश्व टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले खेळाडू होते. १९७० साली विजय अमृतराज आपली पहिली ग्रँड प्रिक्स खेळले होते. १९७३ मध्ये विजय अमृतराज यांनी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची बहुमोल कामगिरी केली होती. अमेरिकेच्या यू.एस. ओपनचा उपांत्यपूर्व सामन्यात विजय अमृतराज पोहोचले होते जिथे यान कोडेस और केन रोजवेल यांच्या सारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते.
१९८३ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांनी गरजू लोकांच्या साठी विजय अमृतराज फाउंडेशन ची स्थापना केली आहे. त्यांना २००१ मध्ये यूनाइटेड नेशन्सने मेसेंजर ऑफ पीस म्हणून गौरवण्यात आले. त्यांना फेयर प्ले साठी यूनेस्कोच्या पियरे कोबेर्टिन यांच्या कडून सम्मानित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, विजय अमृतराज यांनी जेम्स बाँडच्या ऑक्टोपसिटी या चित्रपटात देखील काम केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
plz continue noble work