८९ वर्षापूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला. हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली. मात्र कर्णधार डग्लस जार्डिन (७९) आणि लेस एम्स यांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात अडीचशेची मजल मारता आली. फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला १५८ धावांनी पराभव पाहावा लागला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply