भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले रामनाथ पारकर यांचा ३१ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला.
भारतातर्फे खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही.
ते कव्हर्समध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. डॅशिंग फलंदाज अशी त्यांची इमेज होती. १९७०-७१च्या रणजी हंगामात मुंबईचे अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय संघात खेळत असतानाही या संघाला रणजी अजिंक्यपद मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी न ठरलेल्या रामनाथ पारकर यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना ८५ डोमेस्टिक सामन्यांत ४४५५ धावा केल्या.
रामनाथ पारकर यांचे ११ ऑगस्ट १९९९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply