जन्म. २६ जानेवारी १९५६
डायना एडल्जी हे नाव आज तरुण पिढीतील अनेकांना माहिती नसणार. भारतीय महिला क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव डायना एडलजी आपल्या देशात महिलांचे क्रिकेट ही कल्पनाही कुणी करीत नव्हते तेव्हा डायना एडल्जी यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. डायना एडल्जी या गोलंदाजी पण करायच्या व त्या फलंदाजीही करायच्या. डायना एडल्जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या त्या वेळी महिला क्रिकेट संघटना बीसीसीआयशी संलग्न नव्हती. डायना एडल्जी खेळत असतानाच्या काळात त्यांचे सामने हे भारतीय महिला क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खेळवले जात होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी त्यांनाच पैशांची जमवाजमव करावी लागत होती.
१९७६ ते १९९३ असे तब्बल १७ वर्षे त्या भारतीय संघाकडून खेळल्या. भारतीय क्रिकेट संघाच्या त्या काही काळ कप्तानही होत्या. २० कसोटी सामन्यांबरोबरच एकूण ३४ एक दिवसीय सामने. त्यात २२ वर्ल्ड कपचे सामने खेळलेल्या डायना ह्या मुळच्या मुंबईच्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करायच्या. महत्वाचे म्हणजे महिला क्रिकेटपटुंमध्ये सर्वाधिक चेंडू (५०९८) टाकण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे.
आज जगभर महिलांचे क्रिकेट सामने होत आहेत. क्रिकेट सामन्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे पण डायना यांचा सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम अबाधित आहे.
त्यांनी कसोटी सामन्यात ६३ तर एकदिवसीय सामन्यात ४६ विकेट घेतलेल्या आहेत. त्यांना १९८३ मध्ये खेळातील मानाचा अर्जुन पुरस्कार, २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट क्षेत्रातील सार्वकालिक उत्तम खेळाडू म्हणून त्यांना ओळखले जाते.
भारतीय क्रिकेट निवड समितीच्या त्या सदस्यही आहेत. त्यांचे भारतीय महिला क्रिकेटच्या प्रसारातील योगदान खूप मोठे आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply