नवीन लेखन...

राष्ट्रीय ध्वजसंहिता

India's National Flag Code

गेले काही दिवस महाराष्ट्रातील काही आमदारांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या बातमीवरुन विधिमंडळात आणि बाहेरही गदारोळ सुरु आहे. रा्ट्रीय प्रतिके वापरण्याचे आणि त्यांना योग्य तो मान देण्यासाठी काही नियम केले गेले आहेत. मात्र कितीजणांना हे नियम माहित आहेत हा प्रश्नच आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

याचे कारण म्हणजे सरकारी यंत्रणांकडून या नियमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणारे अपयश हेच असावे. यासाठी समाजानेच जागरुकता दाखवून नियम आणि संहिता पाळली तर राह्ट्रध्वजाचा अवमान करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा सर्व राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

ही ध्वजसंहिता जशीच्या तशी पाळण्याची गरज आहे अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

ध्वजारोहण क्रम

१) ध्वजारोहण/ध्वज फडकवणे
२) राष्ट्रीय सलामी
३) राष्ट्रगीत
४) ध्वजप्रतिज्ञा
५) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

दि. २६ जानेवारी २००२ रोजी भारतात नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले.

१) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

२) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

३) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहण करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहण व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

४) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

ध्वजप्रतिज्ञा

“मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतिक आहे त्या सार्वभौम, समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..