नवीन लेखन...

भारताचे दहावे राष्ट्रपती के.आर. नारायणन

कोचिरील रामन नारायणन उर्फ के.आर. नारायणन यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२१ रोजी झाला मात्र कागदोपत्री ती तारीख चुकून २७ ऑक्टोंबर १९२० अशी नोंदवली गेली. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९२० रोजी झाला.

केरऴ मधील उझवूर या लहान खेड्यात एक दलित कुटूंबात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत हलकीत गेले, या परिस्थितीत दररोज पायी १५ मैल चालत जावून नारायणन यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर ते पत्रकारीतेचे शिक्षण घेवून ‘हिंदू’ या दैनिकात वार्ताहर म्हणून काम पाहू लागले. याच काळात १९४४-४५ च्या दरम्यान वार्ताहर म्हणून गांधीजींशी भेटण्याचा योग आला आणि गांधीजींच्या विचाराने ते एवढे भारावून गेले की ते अंतर्बाह्य गांधीवादी बनले. पुढे गांधीजी यांनी आणि जे.आर.डी.टाटा यांनी त्यांच्या युरोपातील शिक्षणासाठी मदत केली. डॉ. आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ‘London School of Economics’ या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेवून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी प्रो. हेराल्ड लास्की यांच्या मार्गदर्शनाखाली संपादन केली. याच शिक्षण संस्थेत डॉ.आंबेडकर यांनी देखील अर्थशास्त्राची पदवी संपादन करून डॉक्टरेट मिळवली होती. इंग्लंड मधील वास्तव्यात व्ही. के कृष्णन मेनन हे त्यांचे सहकारी होते. त्यांच्या सोबत इंडिया लिग मधेही त्यांनी सहभाग घेतला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रो. लास्की यांनी नेहरूंना नारायणन यांची शिफारस करणारे पत्र लिहीले होते. भारतात परतल्यावर त्यांनी नेहरूंची भेट घेतली आणि नेहरूंच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले. नेहरूंनी त्यांची नियुक्ती स्वत:च्या खात्यातील परराष्ट्रसेवेत केली. टोकियो , लंडन , बँकॉंक, हनोई येथे त्यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पहिले. त्यांचे कार्य पाहून नेहरूंनी १९५५ साली त्यांचा गौरव ‘ The Best Diplomat of the Country’ असा केला होता!

ब्रह्मदेशात राजदूत म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख ‘मा तिंत तित’ या तरूणीशी यांच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून, विवाह संपन्न झाला आणि त्याच पुढे ‘उषा नारायणन’ म्हणून ओळखल्या जावू लागल्या !अमेरिकन दुतावासात त्यांनी १९८० ते १९८४ दरम्यान कार्य प्रमुख कार्य केले. भारतात परतल्यावर त्यांनी जवाहर नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कांही काळ कार्य केले. इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला व १९८४ सालातील सार्वत्रिक निवडणुकीत ते ओट्टपालम या केरळमधील मतदारसंघाचे पहिल्यांदा संसद सदस्य झाले. केंद्रीय मंत्रीपदही भुषविलं! त्यानंतर १९८९ आणि १९९२ साली देखील ते पुन्हा संसद सदस्य म्हणून निवडून आले. त्याच वर्षी म्हणजे १९९२ साली , शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात ते उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि पुढे १९९७ साली टि.एन.शेषन यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले. जेंव्हा नारायणन राष्ट्रपती पदी निवडून आले त्या वर्षी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे होते ! हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल १५ ऑगस्ट १९९७ रोजी भाषण करताना म्हणाले “ स्वातंत्र्याच्या स्वर्णमहोत्सवी वर्षात गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले , कारण दलित कुटूंबातील के.आर. नारायणन राष्ट्रपती झाले आहेत” के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहीले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती, त्यातच त्यांचे मोठेपण होते.

राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यापूर्वीचे राष्ट्रपती मतदान करणे टाळत असत ,मात्र नारायणन यांनी १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून ,मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली !

नारायणन प्रसंगी अतिशय कठोर आणि तेवढेच संवेदनशील असे होते. राष्ट्रपती पदाच्या काळात त्यांनी थेटपणे ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेबद्दल त्यांनी टिप्पणी करून, ती घटना लांच्छनास्पद होती आणि त्यानंतरची परिस्थिती ही गांधीजींच्या हत्येनंतरच्या स्थिती सारखी विषन्न असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय प्रजासत्ताकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घटना डॉ. आंबेडकरांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयांसाठी महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन करून, त्यांनी आंबेकरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून घटना पुनर्विलोकन आयोग स्थापन करणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार त्यांनी २६ जानेवारी २००० च्या भाषणात घेतला. त्यांनी दोन वेळा लोकसभा बरखास्त केली. एकदा इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिल्यावर आणि त्यानंतर एआयडीएमकेने वाजपेयी सरकारचा पाठींबा काढल्यावर ! नारायणन यांनी स्वतंत्रपणे असे अनेक निर्णय घेतले. कारगिल युद्धाबाबत राज्यसभेत चर्चा करण्यास सरकारने तयारी दर्शवावी असा सल्ला त्यांना पंतप्रधान वाजपेयींना दिला होता. कारण १९६२ च्या युद्धाच्या वेळी वाजपेयींनी असाच आग्रह नेहरूंसमोर केला होता आणि नेहरूंनी तो मान्य करून राज्यसभेत त्यावर चर्चा केली होती. तो संदर्भ खूप महत्वाचा होता. त्याच्या कारकिर्दीतील दोन खूप महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, १९९८ साली राज्यपाल सुंदरसिंग भंडारी यांनी शिफारस करूनही त्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.

सर्वात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, २००२ साली गोधरा दंगली बद्दल, परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल त्यांनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. एवढेच नव्हेतर दंगली रोखण्यासाठी गुजरातला लष्कर पाठविण्याची शिफारस देखील त्यांनी केली होती. देशातील आदीवासी, दलित यांच्या साठी अनेक महत्वपुर्ण योजना त्यांनी जाहीर करून सरकारवर नैतिक दबाव निर्माण केला. या कामातून त्यांनी स्वत:ची ओळख नेहमीच ‘घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रीय राष्ट्रपती’ अशी निर्माण केली होती. राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो, हे के.आर. नारायणन यांनी दाखवून दिले.

के.आर. नारायणन यांचे ९ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ राज कुलकर्णी.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..