नवीन लेखन...

चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे

चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे यांचा जन्म २५ एप्रिलला झाला.

गेली ७५ वर्षे चितळे समूह हा दुग्ध व्यवसाय आणि मिठाई उद्योगात आहे. या समूहात इंद्रनील चितळे हे चौथ्या पिढीचे उद्योजक असून त्यांनी नेहमीच तंत्रज्ञान आणि ब्रॅंडिंगवर लक्ष दिले आहे.

इंद्रनील चितळे- चितळे हा ब्रँड ज्याला वारशात मिळाला, असा चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली. उद्योजकता, अर्थकारण, समाजकारण याबद्दल त्याची स्वतःची ठाम मते आहेत. त्याच्या उद्योगाव्यतिरिक्त इतर उपक्रमांतून ती अमलातही आणली आहेत.

२०११ मध्ये इंद्रनील व्यवसायात सामील झाला. त्या आधी त्याने पुण्यातून अभियांत्रिकीचे आणि हार्वर्ड मधून इंजिनिअरिंग करून परदेशात एका ठिकाणी इंटर्नशिप केली होती. त्यानंतर तो- भारतात येऊन व्यवसायात जॉईन झाला. सुरुवात करताना पूर्ण वेळ हाताशी असल्याने जिथे कमी तिथे मी, अशा पद्धतीने सर्वच विभागांत मदत केली. त्या वेळी त्यांच्या काकांनी मला फॅक्टरीमध्ये लक्ष देण्यास सांगितले. यांत्रिकीकरणाद्वारे व्यवसाय कसा सुधारता येईल हे पाहणे, हे इंद्रनीलचे उद्दिष्ट होते. त्या वेळी सर्व विभागांत काम करून फॅक्टरी कशी चालते हे त्याने समजून घेतले व त्यानंतर ती कशी वाढवता येईल, याचा आराखडा मांडला. हा आराखडा मांडायचे कारण हे होते की- स्वतःची दुकाने वाढवायला खूप मर्यादा होत्या. कारण त्यांच्या व्यवसायात ताजा माल विकला जातो. त्याची शेल्फ लाईफ कमी असते. शिवाय एका दुकानात किती ग्राहकांना सेवा देता येते, यावर मर्यादा असतात. त्यामुळे दर्जात तडजोड न करता दुकाने वाढवून व्यवसाय वाढवणे शक्य नव्हते.

सेंट्रलाइज प्रॉडक्शन करून पुरवठा करणे म्हणजे पॅकेजिंग करूनच मिठाई विकणे व त्यातून व्यवसाय वाढवणे शक्य होते. त्याचा आणखी एक फायदा असा होता की, पॅकेजिंग करून विकायचे असेल तर फक्त आपल्याच दुकानात नव्हे, तर डिस्ट्रिब्युशन चेनद्वारे हजारो इतर दुकानांतसुद्धा माल विकता येणार होता. त्यामुळे २०१५-१६ मध्ये स्वतःची दुकाने वाढवण्याऐवजी जास्तीत जास्त उत्पादनांची निर्मिती करणे, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये इनोव्हेशन आणणे आणि जगभरात स्वतःची डिस्ट्रिब्युशन चेन उभारणे- असा धोरणात्मक चितळे उद्योगसमुहाकडून निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी इंद्रनील चितळे कडे देण्यात आली. १९८९ मध्ये पुण्यातील डेक्कनला आणि बाजीराव रोडवर अशी चितळे उद्योगसमुहाची दोन दुकाने होती, आता साधारण ३० दुकाने पुण्यात आहेत. पुण्याच्या बाहेरदेखील एक्स्प्रेस स्टोअर्सच्या माध्यमातून दुकाने वाढत आहेत. सध्या चितळे उद्योगसमुहाचे ३५० डिस्ट्रिब्युटर्स आहेत- जे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आमची उत्पादने पोहोचवतात. त्याचसोबत अमेरिका, इंग्लंड, युरोप, मिडल ईस्ट, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये सर्व माल निर्यात होतो. गेल्या पाच वर्षांत जवळपास काही लाख दुकाने जगभरात चितळे उद्योगसमुहाची उत्पादने विकतात. ठिकठिकाणचे सुपर मार्केट, किराणा माल दुकाने, ऑनलाईन वेबसाईटवर किंवा सॉफ्टवेअर पार्कमधील व्हेंडिंग मशीनमध्ये उत्पादने मिळतात. त्या वेळेपासून आजपर्यंत चितळे उद्योगसमुहाचे सेल्स व्हॉल्युम तीनपट केले आहेत आणि पुढील पाच वर्षांत ते आम्ही परत तीनपट करू या दिशेने प्लॅन चालू आहे. घराण्याची तत्त्वे जपून ही ग्रोथ मिळवणे; त्यासाठी लागणारे फंडिंग, मार्केटिंग, सेल्स, क्वालिटी कंट्रोलिंग कसे असावे, हे सर्व इंद्रनील सध्या पाहतो आहे. इंद्रनील चितळेच्या म्हणण्यानुसार कोणताही ब्रॅंड एका रात्रीत लोकप्रिय बनत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, योग्य संधी, परिपूर्ण टीम आणि महत्त्वाकांक्षेची गरज असते. एक थिंकिंग ब्रेन जसा असतो, तसा त्यांचा आहे. त्यांच्या डोक्याला काही चालना सतत लागते. मी रिकामा बसू शकत नाही. नीड्‌स टू बी ऑक्युपाईड. नशिबाने या पद्धतीने त्याला ग्रूमिंग मिळाले, एक्स्पोजर मिळाले. या सर्वाबरोबरच त्याला जर्मन व इटालियन भाषा येतात.जन्म.२५ एप्रिल
गेली ७५ वर्षे चितळे समूह हा दुग्ध व्यवसाय आणि मिठाई उद्योगात आहे. या समूहात इंद्रनील चितळे हे चौथ्या पिढीचे उद्योजक असून त्यांनी नेहमीच तंत्रज्ञान आणि ब्रॅंडिंगवर लक्ष दिले आहे.

इंद्रनील चितळे- चितळे हा ब्रँड ज्याला वारशात मिळाला, असा चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली. उद्योजकता, अर्थकारण, समाजकारण याबद्दल त्याची स्वतःची ठाम मते आहेत. त्याच्या उद्योगाव्यतिरिक्त इतर उपक्रमांतून ती अमलातही आणली आहेत.

२०११ मध्ये इंद्रनील व्यवसायात सामील झाला. त्या आधी त्याने पुण्यातून अभियांत्रिकीचे आणि हार्वर्ड मधून इंजिनिअरिंग करून परदेशात एका ठिकाणी इंटर्नशिप केली होती. त्यानंतर तो- भारतात येऊन व्यवसायात जॉईन झाला. सुरुवात करताना पूर्ण वेळ हाताशी असल्याने जिथे कमी तिथे मी, अशा पद्धतीने सर्वच विभागांत मदत केली. त्या वेळी त्यांच्या काकांनी मला फॅक्टरीमध्ये लक्ष देण्यास सांगितले. यांत्रिकीकरणाद्वारे व्यवसाय कसा सुधारता येईल हे पाहणे, हे इंद्रनीलचे उद्दिष्ट होते. त्या वेळी सर्व विभागांत काम करून फॅक्टरी कशी चालते हे त्याने समजून घेतले व त्यानंतर ती कशी वाढवता येईल, याचा आराखडा मांडला. हा आराखडा मांडायचे कारण हे होते की- स्वतःची दुकाने वाढवायला खूप मर्यादा होत्या. कारण त्यांच्या व्यवसायात ताजा माल विकला जातो. त्याची शेल्फ लाईफ कमी असते. शिवाय एका दुकानात किती ग्राहकांना सेवा देता येते, यावर मर्यादा असतात. त्यामुळे दर्जात तडजोड न करता दुकाने वाढवून व्यवसाय वाढवणे शक्य नव्हते.

सेंट्रलाइज प्रॉडक्शन करून पुरवठा करणे म्हणजे पॅकेजिंग करूनच मिठाई विकणे व त्यातून व्यवसाय वाढवणे शक्य होते. त्याचा आणखी एक फायदा असा होता की, पॅकेजिंग करून विकायचे असेल तर फक्त आपल्याच दुकानात नव्हे, तर डिस्ट्रिब्युशन चेनद्वारे हजारो इतर दुकानांतसुद्धा माल विकता येणार होता. त्यामुळे २०१५-१६ मध्ये स्वतःची दुकाने वाढवण्याऐवजी जास्तीत जास्त उत्पादनांची निर्मिती करणे, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये इनोव्हेशन आणणे आणि जगभरात स्वतःची डिस्ट्रिब्युशन चेन उभारणे- असा धोरणात्मक चितळे उद्योगसमुहाकडून निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी इंद्रनील चितळे कडे देण्यात आली. १९८९ मध्ये पुण्यातील डेक्कनला आणि बाजीराव रोडवर अशी चितळे उद्योगसमुहाची दोन दुकाने होती, आता साधारण ३० दुकाने पुण्यात आहेत. पुण्याच्या बाहेरदेखील एक्स्प्रेस स्टोअर्सच्या माध्यमातून दुकाने वाढत आहेत. सध्या चितळे उद्योगसमुहाचे ३५० डिस्ट्रिब्युटर्स आहेत- जे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आमची उत्पादने पोहोचवतात. त्याचसोबत अमेरिका, इंग्लंड, युरोप, मिडल ईस्ट, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये सर्व माल निर्यात होतो. गेल्या पाच वर्षांत जवळपास काही लाख दुकाने जगभरात चितळे उद्योगसमुहाची उत्पादने विकतात. ठिकठिकाणचे सुपर मार्केट, किराणा माल दुकाने, ऑनलाईन वेबसाईटवर किंवा सॉफ्टवेअर पार्कमधील व्हेंडिंग मशीनमध्ये उत्पादने मिळतात. त्या वेळेपासून आजपर्यंत चितळे उद्योगसमुहाचे सेल्स व्हॉल्युम तीनपट केले आहेत आणि पुढील पाच वर्षांत ते आम्ही परत तीनपट करू या दिशेने प्लॅन चालू आहे. घराण्याची तत्त्वे जपून ही ग्रोथ मिळवणे; त्यासाठी लागणारे फंडिंग, मार्केटिंग, सेल्स, क्वालिटी कंट्रोलिंग कसे असावे, हे सर्व इंद्रनील सध्या पाहतो आहे. इंद्रनील चितळेच्या म्हणण्यानुसार कोणताही ब्रॅंड एका रात्रीत लोकप्रिय बनत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, योग्य संधी, परिपूर्ण टीम आणि महत्त्वाकांक्षेची गरज असते. एक थिंकिंग ब्रेन जसा असतो, तसा त्यांचा आहे. त्यांच्या डोक्याला काही चालना सतत लागते. मी रिकामा बसू शकत नाही. नीड्‌स टू बी ऑक्युपाईड. नशिबाने या पद्धतीने त्याला ग्रूमिंग मिळाले, एक्स्पोजर मिळाले. या सर्वाबरोबरच त्याला जर्मन व इटालियन भाषा येतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..