रंग खरा काय माझा
ठाव मजला नाही
एकचं रंग अंगी लेणे
हे मला मंजूर नाही
रंग काय कातडीचा
हे कुणा ठाऊक नाही
नका पारखू त्याने माणसा
तो माझा अंतरंग नाही
छटा अनंत काळजाला
इंद्रवज्र व्यापून राही
दे धीराने वेळ थोडा
कुंचल्यात आहे काही
हा असा नि तो तसा
जन्मण्या ना जात काही
असतेच कुठे नाव त्या रंगा
जळ निर्मळ वाहे प्रवाही!!
— वर्षा कदम.
Leave a Reply