नवीन लेखन...

इंडक्शन कुकर

आपण रोजच्या वापरात जो कुकर वापरतो तो इंधनातून निर्माण होणाऱ्या उष्णतेवर चालवला जातो. विजेवर चालणारा कुकर हा विद्युत उपकरणातील ज्युल हिटिंगच्या तत्त्वावर चालतो. जेव्हा कुकरच्या भांड्याला उष्णता मिळते त्यावेळी भांडे तापून आतले पाणी तापते व त्यामुळे अन्न शिजण्याची प्रक्रिया घडून येते.

इंडक्शन कुकरमध्ये भांडेच हिटिंग एलमेंटचे काम करते. सोप्या शब्दांत भांडेच अन्न शिजण्यासाठी लागणारी उष्णता निर्माण करण्याचे काम करते. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्त्व वापरलेले असते. या कुकरमध्ये कॉईल असते व ती सतत बदलणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करीत असते. त्यामुळे कॉईलच्या जवळ ठेवलेल्या भांड्याच्या भागात एडी करंट निर्माण होतो. जर भांडे चुंबकीय पदार्थाचे बनलेले असेल तर बदलत्या चुंबकीय क्षेत्राची जोड त्याला लाभते. यात चुंबकीय क्षेत्र हे ४० ते १०० किलोहर्टझने बदलत असते.

या मायक्रोवेव्ह कुकिंगमध्ये अन्नाच्या मिश्रणातील रेणूंमध्ये अधिक जास्त फ्रिक्वेन्सीने स्पंदने निर्माण केली जातात. या इंडक्शन कुकरमध्ये मात्र कमी फ्रिक्वेन्सीला स्पंदने निर्माण केली जातात, पण त्याचवेळी लोखंडी भांड्याच्या तळाशी मोठ्या प्रमाणात एडी करंटची चक्रे(लुपस) तयार होतात. त्यामुळे भांड्याला उष्णता मिळते व त्यातील अन्न शिजते. खूप भराभर बदलणाऱ्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे तेवढ्याच फ्रिक्वेन्सीची विद्युतचुंबकीय प्रारणे तयार होतात.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मात्र उच्च २.४५ गिगॅहझपर्यंत फ्रिक्वेन्सी वापरलेली असते त्यामुळे विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडू नयेत यासाठी त्यांची रचना अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. कारण अशा मायक्रोवेव्हजमुळे आरोग्यास धोका असतो. विशेष करून जे लोक पेसमेकर वापरतात त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. इंडक्शन कुकरमध्ये कमी फ्रिक्वेन्सी वापरल्याने त्यात हा धोका तुलनेने कमी असतो.

मायक्रोवेव्ह व इंडक्शन कुकरजवळ काम करताना हातात धातूच्या बांगड्या, घड्याळे वापरू नयेत. या कुकरमधूनही विद्युतचुंबकीय प्रारणे बाहेर पडण्याचा धोका असतो. त्यामुळे यात भांडे ठेवताना खूप काळजी घ्यावी लागते. पेसमेकर वापरणाऱ्यांनाही इंडक्शन कुकरमुळे धोका संभवत नाही असे काही अभ्यासात दिसून आले आहे.

जपानमध्ये इंडक्शन तत्त्वावर चालणारे राईस कुकर वापरले जातात. एकतर इंडक्शन कुकरमध्ये गॅसची जशी ज्योत दिसते तशी दिसत नसते. संपूर्ण भांड्यात सारख्याच प्रमाणात उष्णता पसरत असल्याने त्याची औष्णिक कार्यक्षमता चांगली असते. यात वीजही फार मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..