आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली होती.
प्रसिद्ध उद्योजक हरिश महिंद्रा आणि इंदिरा महिंद्रा यांच्या महिंद्रा घराण्यात आनंद महिंद्रा जन्म झाला. तसे महिंद्रा यांचे निवासस्थान मुंबई; परंतु त्यांचे वडील हरिश यांनी आनंद यांच्या शालेय शिक्षणासाठी तामिळनाडू हे राज्य निवडले. येथील लवेडेलमधील लॉरेंस स्कूलमध्ये आनंद यांचे शिक्षण झाले. पुढे आनंद उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या सर्वात प्रसिद्ध अशा हावर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. हावर्ड विद्यापीठातून फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्ट या विषयांचे अध्ययन केले तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण झाल्यावर आणि अमेरिकेतून एमबीए केल्यावर आनंद यांनी १९८१ मध्ये पहिली नोकरी महिंद्राच्या स्टील कंपनीमध्ये सुरु केली. १९९१ त्यांनी महिंद्रा ऍंण्ड महिंद्राचे डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये आनंद महिंद्रा संपूर्ण महिंद्रा ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि चेअरमन म्हणून करू लागले. आतात ते कंपनी ग्रुपच्या चेअरमनपदावर आहेत.
महिंद्राने स्टील प्लॅंटपासून सुरुवात करीत ऑटोमोबाइल, बांधकाम उपकरणे, संरक्षण, ऊर्जा, शेतीची उपकरणे, वित्त आणि विमा, औद्योगिक उपकरणे, माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टिक, रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. महिंद्रा ग्रुप ही १९ बिलियन यूएस डॉलरएवढी मोठी संघटना आहे. तर आनंद महिंद्रा यांची संपत्ती १.५५ बिलियन यूएस डॉलर एवढी आहे. भारत सरकारने २०२० मध्ये आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त असूनही आनंद महिंद्रा सोशल मीडियामध्ये खूप अॅलक्टिव्ह असतात. त्यांनी शेअर केलेले ट्वीट सामाजिक संदेश देणारे किंवा मनोरंजन करणारे असतात.आनंद महिंद्रा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जीवनातील पाच महत्त्वाचे घटक सांगितले. या घटकांमुळे ते आज यशस्वी बिझनेसमन म्हणून प्रसिद्ध आहेत.
नेहमी मोठा विचार करा – आनंद महिंद्रा सांगतात नेहमी मोठा विचार करा. छोटा विचार केल्याने आपल्याला तेवढेच किंवा त्याहून कमी यश मिळते. म्हणून बिझनेसमन किंवा सर्वसामान्य मनुष्यांने नेहमी मोठा विचार करावा.
यश मिळेपर्यंत लढत रहा – जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालूच ठेवा. न थकता, लढत रहा आणि तुमचे ध्येय साध्य करा, असे आनंद महिंद्रा सांगतात.
शांततेने कामातील समस्या सोडवा… काम म्हटले की त्यात असंख्य समस्या आल्याच. त्यानंतर कधी-कधी पारा चढणार, राग येणार हे नक्की. म्हणूनच शांततेने कामातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
नवे काही शिकण्यावर भर द्या… आनंद महिंद्रा सांगतात, नेहमी नवे काहीतरी शिकण्यावर भर द्या. तुम्ही तरुण असाल किंवा वृद्ध रोज काहीतरी शिका. त्यातूनच आपल्या ज्ञानात वाढ होते आणि जगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळतो.
देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा… आनंद महिंद्रा यांना भारतीय असल्याचा गर्व आहे आणि आपला देश जागतिक महासत्ता कसा बनेल यासाठी ते झटत असतात. म्हणूनच महिंद्रा कंपनी नवनवे तंत्रज्ञान देशात आणत असते आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावत असते. त्याप्रमाणे सर्व भारतीयांनी देशाच्या प्रगतीत आपल्या परीने हातभार लावावा असे, महिंद्रा सांगतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply