उद्योगपती संजीव गोएंका यांचा जन्म २९ जानेवारी १९६१ रोजी झाला.
संजीव गोयंका यांचं नाव प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीत आहे. संजीव गोएंका हे भारतीय मल्टीनॅशनल कंपनी असणाऱ्या आरपी संजीव गोएंका ग्रुपचे संस्थापक मालक आहेत. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
गोएंका ग्रुपचं मुख्य कार्यालय कोलकाता येथे असून २०११ साली ही कंपनी उदयास आली. विविध क्षेत्रात गोएंका ग्रुपने आपली गुंतवणूक केली असून प्रामुख्याने इलेक्ट्रिक युटेलिटी अर्थात वीज पुरवठा कंपनी, रिटेलिंग, आय़टी सर्व्हिसेस, मीडियासह स्पोर्टस आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यात सारेगामा इंडिया लिमिटेड, टू यम, नेचर्स बास्केट, वुडलँड हॉस्पीटल,फिलिप्स कार्बन ब्लॅक या काही प्रसिद्ध कंपन्या आरपीएसजी ग्रुपच्या अंतर्गत आहेत.
ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने, मीडिया आणि मनोरंजन, शिक्षण आणि आयटी, हे सहा उद्योग आहेत.
गोयंका यांच्या समुहात ५० हजाराहून अधिक लोक काम करत आहेत. तसेच त्यांची ४.३ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. तसेच त्यांच्या समुहाचे लाखो शेअरहोल्डर्स आहेत.
संजीव हे इंडियन सुपर लीगमधील एटीके फुटबॉल क्लबचे मालक आहे. २००९-२०१० मध्ये त्यांची ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याशिवाय ते IIT खरगपूरचे अध्यक्ष देखील आहेत. २००१ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. सर्वात तरूण वयात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. याशिवाय पंतप्रधान व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्यही राहिले आहेत.आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी दोन नव्या संघांचा समावेश झाला असून संघ संख्या ८ वरून १० झाली आहे. लखनऊचा संघ उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालिकीच्या आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली. CVC कॅपिटलने ५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. या संघाचे कर्णधारपद लोकेश राहुल भुषवणार असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएमध्ये त्यांचा संघ ‘लखनौ सुपर जायंट्स’ या नावाने ओळखला जाणार आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply