नवीन लेखन...

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in Men - From the Perspective of Ayurveda

घृत हेच माध्यम का ?

नस्य द्रव्यांमध्ये चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे पसरले जात नाही म्हणून नस्य द्रव्य द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्नेह (स्निग्ध द्रव्य) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य आहे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत व मनुष्याच्या मानसिकतेचा विचार करून “घृत” हेच माध्यम वापरणे योग्य ठरते.

प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण:

ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम

वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : प्रथम बाटली गरम पाण्यात ठेऊन प्रजांकुर (घृत) पातळ करावे. आडवे झोपून ६ – ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ – ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.

अश्वमाह वटी – चिकित्सा विश्लेषण :

 “अश्वमाह” हे सात औषधांचे सुरेख मिश्रण आहे. बऱ्याच शुक्रवर्धक व शुक्रस्तंभक औषधी पाठांचे वर्णन करतांना ‘अश्व’ हा शब्द ‘शक्तीच्या संदर्भात’ वापरला असतो किंवा त्या औषधाच्या माहिती पत्रकात चक्क घोड्याचे चित्र असते. “अश्वमाह” मध्ये “अश्वगंधा” ही प्रधान व अत्यंत गुणकारी वनस्पती अग्रक्रमांकाने वापरली असल्यामुळे ह्या पाठाला ‘अश्वमाह’ नाव दिले आहे. हा पाठ रसायन, वाजीकरण, शुक्रप्रवर्तक, शुक्रवर्धक, शुक्रस्तंभक, शुक्रदोष नाशक तसेच, शुक्रबीज संख्या, वीर्याचे प्रमाण व मैथुनशक्ती वाढवणारा अशा गुणांनी परिपूर्ण आहे.

 अश्वगंधा (Withania somnifera) :

मानसिक ताण-तणावामुळे कॉर्टिसॉल नामक हॉर्मोन वाढून मेंदूवर विपरीत परिणाम होतो व शुक्रधातु निर्मिती रोडावू लागते. मेंदूतील पिट्युटरी किंवा सुप्रारीनल ग्रन्थिच्या विकारामुळे हा रोग होतो. अश्वगंधामुळे रक्तातील कॉर्टिसॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे होणारे इतर दुष्परिणामही ह्याने कमी होतात. शिवाय रोडावलेली शुक्राणूंची संख्या वाढते. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम देखील लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वाढ होते.

आत्मगुप्ता (Mucuna pruriens) :

आत्मगुप्ता आपल्या पेशीरक्षक गुणांमुळे शुक्राणूंची संख्या व चलन-वलन गती वाढवते त्याचबरोबर रक्तातली शर्करा पातळी शरीराला आवश्यक तेवढ्या नैसर्गिक पातळीत आणते.

श्वदंष्ट्रा (Tribulus terrestris) :

श्वदंष्ट्रा सेवनाने ६० दिवसांमध्ये क्षीणशुक्र म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया नाहीसा होऊन शुक्रबीज संख्येत ७८.११ % वाढ होते.

नारायणी (Asparagus racemosus) :

वाजीकर गुणांच्या दृष्टीने Sildenafil citrate हे औषध जगप्रसिध्द आहे. परंतु त्याचे दुष्परिणामही तेवढेच लक्षणीय आहेत. नारायणी ही उत्तम वाजीकर असून पूर्णपणे निर्दोष अशी वनस्पती आहे. Sildenafil citrate व नारायणी ह्यांच्या तुलनात्मक संशोधनातून हा निष्कर्ष प्राप्त झाला. थोडक्यात नारायणी वाजीकर गुणांनी परिपूर्ण वनस्पती आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पेश्यांतर्गत मायटोकॉन्ड्रिया वर कार्य होऊन हे संरक्षण प्राप्त होते.

 कोकिलाक्ष (Hygrophila spinosa) :

वाजीकरण आणि शुक्राणुवर्धन ह्या दोन्ही मध्ये श्रेष्ठ अशी ही वनस्पती आहे. अनापत्यता, लैंगिक दुर्बलता, शुक्रमेह अशा विकारांमध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे. कोकिलाक्ष सेवनाने “हॉर्मोनल व न्युरो-हॉर्मोनल” यंत्रणेत बदल घडून हे परिणाम दृष्ट स्वरुपात साकार होतात. रक्तातील टेस्टोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल व प्रथिनांमध्ये समतोल राखून ही वृष्य, वाजीकर व धातुपोषक कार्य करते.

अक्कलकारा (Anacyclus pyrethrum) :

वीर्यवर्धन, शुक्राणु संख्यावर्धन, बलवर्धन व प्रजनन शक्ती सुधार अशा अनेक बीजस्वास्थ्योपयोगी गुणांनी समृद्ध अशी ही वनस्पती आहे. हिच्या सेवनाने वृषण ग्रंथींचा आकार व वजन वाढते, पौरुषग्रंथीचा आकार वाढतो, शुक्रवाहिनीचा व्यास वाढतो, वृषणाला रक्त पुरवठा सुधारतो, शिस्नाचा ताठरपणा तीन पटीने वाढतो. अर्थातच प्रजननाच्या दृष्टीने सर्व अनुकूल गुण ह्या वनस्पतीत ठासून भरले आहेत.

 नागवल्ली पत्र (Piper betle) :

नागवल्ली पत्र म्हणजे सर्वांना सुपरिचित असलेले विड्याचे पान. मानसिक ताण-तणाव हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे आणि यावर इमिप्रामाईन नामक औषध आधुनिक वैद्यकात दिले जाते. नागवल्ली व इमिप्रामाईन यांच्या तौलनिक अभ्यासातुन नागवल्लीचा मानसिक ताण-तणाव निर्मूलनाचा गुण इमिप्रामाईन पेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले. ह्यातील सुगंधी द्रव्याचा परिणाम मज्जा यंत्रणेवर होऊन एपिनेफ़्रिन व नॉरएपिनेफ़्रिन चे स्राव उत्तेजित होतात ज्यामुळे मज्जा यंत्रणेला प्रोत्साहन मिळते. शिवाय “चेविकॉल” हे तिखट द्रव्य उत्तम पाचक व उत्तेजकाचेही कार्य करते.  नागवेलीपत्रातील रसायन विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणाऱ्या शुक्रदोष निवारणात समर्थ आहे.

पाठातील प्रत्येक घटकाची माहिती घेतल्यावर असे स्पष्ट होते की केवळ शारीरिक बाबींकडे लक्ष न देता ताण-तणाव, नैराश्य अशा मानसिक बाबींचाही सखोल अभ्यास करून “अश्वमाह” ची रचना व निर्मिती करण्यात आली आहे. “अश्वमाह” च्या सेवनाने निकोप व सुदृढ पुरुषबीजांची आवश्यक तेवढ्या संख्येत उत्पत्ती होते.

अश्वमाहच्या प्रत्येक विलेपित गोळीत

घनसत्व स्वरूपात: अश्वगंधा ५०० मिलीग्रॅम, आत्मगुप्ता, श्वदंष्ट्रा प्रत्येकी २५० मिलीग्रॅम, नारायणी, कोकिलाक्ष प्रत्येकी १२५ मिलीग्रॅम; चूर्ण स्वरूपात: अक्कलकारा १२५ मिलीग्रॅम; भावना द्रव्य: नागवल्ली पत्र – आवश्यकतेनुसार

सेवन विधी: २ – २ गोळ्या रोज दोन वेळा घोटभर दुधाबरोबर, जेवणापूर्वी.

लेखक –

वैद्य संतोष जळूकर
संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

Prajankur Ashwa

drjalukar@akshaypharma.com

Keywords :
Aushadhi Garbhasanskar, Childless, Cortisone, Ejaculation, Emipramine, Erectile dysfunction, Erection, Follicle Stimulating Hormone, Garbhasanskar, Infertility, Libido, Luteinizing hormone, Male infertility, Masturbation, night fall, Orgasm, Pregnancy, Premature ejaculation, Sex education, Sterility, Swapnavastha, Testosterone, Unsatisfactory Erection, Womb, अनपात्यता, औषधी गर्भसंस्कार, गर्भसंस्कार, गर्भाधान, गर्भावस्था, पुरुष वंध्यत्व, लिंग उत्थान, लैंगिक दौर्बल्य, लैंगिक विकार, वंध्यत्व, वीर्य, वीर्य दोष, वीर्य पातळ होणे, शुक्र, शुक्रधातू, शुक्रबीज, शुक्रविकार, स्वप्नावस्था, हस्तमैथुन

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..