नवीन लेखन...

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in women from the perspective of ayurveda

प्रथमाह (विलेपित वटी) :

मधुकं शाकबीजं च पयस्या सुरदारु च । . . . . अष्टाङ्गहृदय, शारीर स्थान, अध्याय २, श्लोक ५४

यष्टिमधु, शाकबीज, शतावरी व देवदार ह्या वनस्पतींचे संतुलित मिश्रण म्हणजेच “प्रथमाह”. वास्तविक मूळ ग्रंथानुसार पयस्या म्हणजे क्षीरकाकोली वापरण्याचे विधान असले, तरी ही एक संदिग्ध वनस्पती आहे. त्यामुळे शास्त्रसंमत प्रातिनिधिक द्रव्य असलेल्या शतावरीचा वापर केला आहे.

यष्टिमधु: गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीबीज वाहिन्यांमधील श्लेष्मल अंतस्त्वचेची स्निग्धता संपन्न राहण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. गर्भधारणेच्या वेळी स्त्री-बीज व पुंबीजाचे मीलन बीजवाहिनीत होते. साधारणतः १० दिवसांनी हा फलित बीजकोष गर्भाशयात स्थानापन्न होतो. बीज वाहिनीतील स्निग्धता ह्या क्रियेसाठी आवश्यक असते. यष्टिमधु मधील ग्लाब्रीन व ग्लाब्रीडीन ह्या अल्कलॉइड मुळे इस्ट्रोजीनसदृश कार्य होते. बीजवाहिनी मधील श्लेष्मा व त्याचा स्निग्धपणा त्याने वाढतो. यष्टिमधु चे कार्य अशा प्रकारे गर्भस्थापनेच्या दृष्टीने उपयोगी होते अर्थात “बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणेची ” (Ectopic pregnancy) शक्यता कमी होते.
बीज दोष हा गुणसूत्रांमध्ये असतो व तो गर्भामध्ये येऊ शकतो. म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी बीजदोष निवारण करणे जरुरीचे आहे. यष्टिमधु मध्ये गुणसूत्रांमधील बीजदोष निर्मूलनाची क्षमता आहे. इथाइल मिथेन सल्फोनेट नामक विषारी द्रव्य पेशीतील डी. एन. ए. वर आघात करतात व त्याने बीजातील गुणसूत्र विकृत होतात. यष्टिमधु चा उपयोग ह्या विकृतीच्या निवारणासाठीही होतो.

शाक बीज: हे बीज विविध प्रकारच्या १५ प्रथिनांनी संपन्न आहे. यकृताचे कार्य उत्तम राखण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. गर्भाशयातील अंतस्त्वचेची घनता कमी होणे हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे. ही घनता पूर्व स्थितीत आणण्याचे सामर्थ्य ह्यातील प्रथिनांमध्ये आहे. ज्यामुळे गर्भस्थापना होण्यास योग्य वातावरण निर्माण होते.

शतावरी: गर्भाशयात झालेल्या शस्त्राघात जन्य गाठी (Surgical adhesions) आपल्या स्वगुणांनी नष्ट करण्याचे एकमेवाद्वितीय कार्य शतावरीने साध्य होते. त्यामुळे अर्थातच गर्भधारणेला अडथळा निर्माण करणारी एक आपत्ती नाहीशी होते. ह्याशिवाय शतावरी मुळे गर्भाशयातील अंतस्त्वचेचे पोषण उत्तम रीतीने होते व गर्भस्थापना होणे सहज सुलभ होते. सर्वांगीण मनोकायिक पोषण करणे हा तर शतावरीचा स्थायी भावच आहे.

सुरदारु: पेशी चयापचय क्रियेत काही घातक परमाणु (Free radicals) तयार होतात. हे परमाणु गर्भाशयाच्या स्वास्थ्याला हानी पोचवतात. ह्या हानी पासून संरक्षण करण्याचे सामर्थ्य सुरदारुतील मटेरीसिनॉल, नॉरट्रकिलोजेनिन व डायबेंझिल-बुटायरो-लॅक्टोलिग्नान अशा तीन पेशीरक्षकांच्या सहाय्याने चुटकीसरशी साध्य होते.

“प्रथमाह”च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण
यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), शाक बीज (Tectona grandis), शतावरी (Asparagus racemosus), सुरदारु (Cedrus deodara) प्रत्येकी १२५ मिलीग्राम
भावना द्रव्य: शतावरी (Asparagus racemosus) १२५ मिलीग्राम
सेवन विधी: २ – २ गोळ्या रोज दोन वेळा घोटभर दुधाबरोबर, जेवणापूर्वी


वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..