नवीन लेखन...

सलोह काँक्रीटची तपासणी

एकदा काँक्रीटचे बांधकाम पुरे होऊन काही वर्षे उलटली की त्याच्या तपासणीची गरज पडते, कारण १) कोणत्याही शहरी विभागात काँक्रीटचे कोणतेही बांधकाम १५ वर्षे उलटली की महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी करणे बंधनकारक असते. २) अशी तपासणी तज्ज्ञांकडून करवून घेऊन ती सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्रथम १५ वर्षांनी आणि नंतर 15 कुतूहल दर पाच वर्षांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. ३) इमारतीच्या काँक्रीटच्या भागाला अथवा भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या नुसत्या डोळ्यांनी दिसत असतील तर अशी तपासणी कसन केली पाहिजे. ४) पष्कळवेळा पाटर्डचा ठिकाणी पाया खचतो, भिंती व त्यावरील तुळया यांच्यातील फट वाढलेली दिसते. भेगा दरवर्षी मोठ्या होताना दिसतात. विशेषतः भूकंपानंतर तर त्या मोठ्या होतातच.

अशा परिस्थितीत मजबुतीचे निदान करून इमारत किंवा इतर बांधकाम वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून ती पूर्वस्थितीत आणण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करता येतात. १) प्राथमिक चाचणी म्हणून हातोड्याने खांब, तुळया, स्लॅब यावर जोरात ठोका मारून या गोष्टी भरीव आहेत की पोकळ झाल्या आहेत हे पाहावे. २) खांब, तुळया यांची सोनोग्राफी चाचणी करून त्यांच्या पोकळपणाची परीक्षा करता येते. ३) या दोन्ही चाचण्यांवरून चित्र स्पष्ट झाले नाही तर एका यंत्राद्वारे काँक्रीटच्या पृष्ठभागालगतचा एक छोटा दंडाकृती तुकडा काढून त्याची दाब क्षमता प्रयोगशाळेत तपासली जाते. तसेच त्याचे रासायनिक पृथःकरण केले जाते. ४) होलोग्राफ या उपकरणाद्वारे आतील भागाचे एक्स-रे अथवा सीटी स्कॅनसारखे संपूर्ण छायाचित्र घेता येते. त्यावरून आतील भेगा, छिद्रे, पोकळ्या इत्यादी दोष स्पष्ट होतात. पोलादी सळ्यांची स्थितीही समजते. वरील चाचण्यांचा एकत्रित विचार करून विश्लेषण करावे लागते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..