नवीन लेखन...

बुद्धिमत्ता’ आहे कि नुसतीच ‘स्मरणशक्ती’ ?

कुणी लिहिलंय माहित नाही.. पण झणझणीत आहे. नुसतंच बोलबच्चनगिरी करणार्‍या शिक्षणतज्ज्ञांनी यातून काहितरी घ्यावं !


मी स्वतः माझ्या शैक्षणिक आयुष्यात फार काही ‘दिवे’ लावले नाहीत..त्यामुळे ‘शिक्षण’ ह्या विषयावर मला खरंतर बोलायचा अधिकारच नाही..पण काही शब्द तोंडात घुटमळत राहतात म्हणून त्यांना बाहेर ढकलतोय एवढंच..

दहावीचा रिझल्ट लागला..बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांना ८५-९०-९५ % ह्या ‘रेंज’ मध्ये मार्क मिळाले आहेत..म्हणजे आपण म्हणतो कि जेवढे मार्क जास्त तेवढा तो विद्यार्थी/ विद्यार्थिनी हुशार..पण ह्या मार्कांच्या शर्यतीत ज्यांना ६०-७० % ह्या रेंज मध्ये मार्क्स मिळालेत त्यांचं काय ? म्हणजे ही मुलं हुशार नाहीत ? त्यांना चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळणं सोडाच पण शेजार-पाजारचे लोक सुद्धा एका तुच्छ नजरेने बघतात…”एवढे कमी मार्क मिळाले म्हणजे नक्कीच काहीतरी थेरं केलेली असणार “अशाप्रकारचे टोमणे मारले जातात..”तुम्हीपण मिळवायचे होतेत मार्क..अभ्यास करायचा मान मोडून..कुणी अडवलं होतं ?”-असे प्रश्न ह्या विद्यार्थ्यांवर शस्त्रासारखे फेकले जातात..अशा विद्यार्थ्यांकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा लगेच बदलतो..म्हणजे ६०-७०% मार्क मिळवणं हा आता खुनाइतकाच गंभीर अपराध आहे अशी भावना ह्या मुलांच्यात रुजू व्हायला लागते..७०% मिळवणारा मुलगा म्हणजे ‘दगड’ आणि ९०% मिळवणारा म्हणजे ‘हुशार’..पण अगदी खरंच मला प्रश्न पडतो..कि खरंच ९०% मिळवणारा हुशार समजावा ? किंवा ७०% मिळवणारा दगड होतो ?

नाही नाही..ज्यांना आता ९०% मार्क मिळाले आहेत त्यांच्यावर मला ताशेरे ओढायचा काहीएक अधिकार नाही हे १००% मान्य.

पण ही खरंच त्या विद्यार्थ्यांची ‘हुशारी’ म्हणता येईल ?ही खरंच ‘बुद्धिमत्ता’ आहे कि नुसतीच ‘स्मरणशक्ती’ ?

जग इथे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना,पहिल्या महायुद्धात किती लोक मेली,किंवा चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून किती पोरं जन्माला घातली किंवा श्री-लंकेत किती पाऊस पडतो, अफगाणिस्तान मध्ये कुठली पिकं पिकतात.हे फक्त लक्षात ठेवून ते ३ तासात लिहिणं . किंवा find x असली निरर्थक गणितं सोडवणं म्हणजे खरंच ‘हुशारी’ समजावी का ? ह्या सगळ्याचा खरंच पुढल्या आयुष्यात काही उपयोग होतो का ?

म्हणजे एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळत असेल,किंवा एखादा मुलगा चांगला अभिनय करत असेल, गाणं म्हणत असेल, वक्तृत्व चांगलं असेल,तर त्या मुलाला किंवा मुलीला केवळ “महायुद्ध सुरु होण्याची तारीख” लक्षात नाही राहिली म्हणून तो दगड होतो का ? नाही माझ्या लक्षात कि नागासाकी आणि हिरोशिमा वर कधी बॉम्ब पडला..मग ? मी बिनडोक झालो का ?दुर्दैवाने हो..हे माझ्या लक्षात नसेल तर मी बिनडोकच धरला जातो..मला चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळत नाही..माझं भवितव्य ‘धोक्यात’ येतं..

अहो “कावळा काळा असतो ” हे दिवसातून शंभर वेळा म्हणून ते तसंच्या तसं परीक्षेत उतरावयण्यत कसली आली हुशारी ?त्यापेक्षा मुला-मुलींच्या बुद्धीला खरोखरीच चालना मिळेल असे विषय आपण का नाही शिकवू शकत ? शेती, बँकिंग, वॉटर मॅनेजमेंट,स्वच्छता आणि वेस्ट-मॅनेजमेंट,फिजिकल फिटनेस, सेल्फ-डिफेन्स,सारखे विषय आपण का नाही आपल्या अभ्यासक्रमात घेऊ शकत ? हे सगळे विषय ‘इज्राएल’ मध्ये शाळांतूनच मुलांना शिकवले जातात…तिथे ‘स्वच्छते’साठी कुठचं अभियान राबवायची गरजच नसते..वेळप्रसंगी तिथला कुठलाही मुलगा-मुलगी ‘आर्मीत’ जाऊ शकते..त्यांना तसं ट्रेनिंगच दिलेलं असतं..

‘चाणक्य’ नावाचा एक महान विद्वान आपल्याकडे होऊन गेला..का नाही आपण ‘चाणक्य-नीती’ शिकवू शकत ?

आपल्याकडे आपण काय शिकतो ? कुठला पुढारी कितीवेळा उपोषणाला बसला.त्याच्या तारखा…अमक्या मुघलाला किती पोरं झाली…अमका मुघल कुणाचा खून करून गादीवर बसला..सिन थिटा,कॉस थिटा ज्याचा उभ्या आयुष्यात कधी उपयोग झालेला माझ्यातरी पाहण्यात नाही..तो दळभद्री X शोधा…कशासाठी ?

हे सगळं निरर्थक शिक्षण आपण अजून किती वर्ष आपल्या मुलांवर लादणार आहोत ? आणि ह्याच्या आधारावर अजून किती वर्ष आपल्या मुलांची ‘हुशारी’ तपासणार आहोत ? ठाऊक नाही..पण खरंच..हातात झाडू घेऊन जशी सगळी जळमटं आपण साफ करतो ना, तसाच एखादा झाडू घेऊन ही जुनाट शिक्षण पद्धती साफ करावीशी वाटते..कुणीतरी म्हटलंच आहे ना.

“Exams are a test of your memory..Not your intelligence “

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..