बालगंधर्व रंगमंदीराच्या जागेवर अगोदर “आशानगर” नावाची झोपडपट्टी होती. सुंदर जिमखान्याला कुरूपतेचा हा डाग होय अशी पुणेकरांची भावना होती.
दस्तुरखुद्द बालगंधर्वांच्या हस्ते कुदळ मारली जात असतांना डॉ.बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आला होता. शनिवार, नारायण, सदाशिव पेठा मधील नागरिकांसाठी बालगंधर्व रंगमंदीराची निर्मिती आरंभली आहे. नदीच्या पलीकडे कोण जाणार? अगोदर रिक्षाभाडे नंतर नाटकाचा तिकीट दर शिवाय रात्री बे रात्री कोण नाट्य रसिक जाणार लांबच्या बालगंधर्व रंग मंदिराला?
बालगंधर्व रंग मंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्याअगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: रंगमंदिराची वीस लाख खर्च करून रंग मंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे. नंतर भुजंगराव कुलकर्णी आयुक्त यांनी आचार्य अत्रे यांचे ऐवजी नगरपालिकेने कां बांधू नये?नगरपालिकेनेच रंग मंदिर बांधावे असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीसाठी ठेवला. पुणे शहरात एकच गदारोळ उठला. नाट्य थिएटर उभारणे नगरपालिकेचे काम नाही. असा बूट निघाला. त्यावर नगरपालिकेने फक्त संडास आणि मुता-याच बांधायच्या कां? त्यांनी चांगले काम करायचे नाही कां? प्रश्न करण्याची पध्दत बघा. ते फक्त आचार्य अत्रे यांनांच जमले.
बांधकामाचे कंत्राट बी.जे शिर्के या नामांकित कंपनीला देण्यात आले. मुदत घातली. उलटाक्रम लावण्यात आला जसे १८०,१७९,१७८ असा. विद्युतीकरण महाराष्ट्र इलेक्टीक कार्पोरेशनला देण्यात आले. ते पूर्वी सकाळ परिसरात होते. रंगमंदिर उद्घाटन सोहळा ठरला. निमंत्रणे सर्वेसर्वा पुलं यांच्या अखत्यारीत. कार्यक्रम ठरला. अनावरण शुभ हस्ते आचार्य अत्रे. प्रमुख पाहुणे मा यशवंतराव चव्हाण अध्यक्ष महापौर नारायणराव गोरे. पुलंनी मुंबई साहित्य संघ मंदिराला डावलून पार्ले सेवा संघाला निमंत्रण दिले. झाले… मुंबईतील साहित्यिक मंडळी नाराज. साहित्यिकानी आचार्य अत्रेकडे धांवले. आचार्य अत्रे यांनी अनावरण आजारपणमुळे अनुपस्थिती. पण तार पाठवून रंगभूमी सासर सोडून माहेरी आली. हा अग्रलेख अवश्य वाचून दाखवावा ही विनंती. अनावरण यशवंतरावानी केले. नानासाहेब अळंटळं करू लागले. मी एकदम ओरडलो. आचार्य अत्रे यांचा अग्रलेख वाचा. सर्वत्र कल्ला झाला. नानासाहेबांनी अग्रलेख मनापासून वाचला. नंतर आचार्य अत्रे यांनी बालगंधर्व रंग मंदिर महिनाभर बुक केले. प्रीतिसंगम नाटकाचे प्रयोग महिनाभर. पहिल्या दिवशी सहा दिवसांचा प्लॅन आचार्य अत्रे यांनी जाहीर केला लोक म्हणाले आचार्य अत्रे यांना वेड लागले. आचार्य अत्रे डगमगले नाहीत. पहिल्या तासांत सहा दिवसांचा प्लॅन संपला. आचार्य अत्रे यांनी बालगंधर्व रंगमंदिरांतही नाटकं हाऊस फुल्ल होतात. विरोधकांना चपराक. अत्रे थिएटर चा विजय. आचार्य अत्रे यांची इतर नाटके गाजली. आचार्य अत्रे यांनी पुन्हा एकदा परत पुणे जिंकले. महिनाभर आचार्य अत्रे यांचा जल्लोष.
— ॲड. बाबुराव कानडे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply