व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून घोषित केला गेला. १९८१ साली यूएन महासभेचे एक ठराव मंजूर केला आणि सप्टेंबरचा तिसरा मंगळवार आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून स्थापित केला. त्याच वर्षी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. वास्तविक,१९८१ ते २००२ हा दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जात असे. परंतु २००२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने २१ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून घोषित केला.
आंतरराष्ट्रीय शांती दिवसाच्या या वर्षीची थीम आहे. ‘न्याय्य आणि शाश्वत जगासाठी चांगले पुनर्प्राप्त करणे’.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply