मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. त्यामुळे मैत्री, जिव्हाळा जपण्यासाठी वर्षातले काही दिवस खास असतात. दरम्यान जगभरात दरवर्षी ३० जुलै हा दिवस जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर सर्वांनी मित्र मैत्रिणींना ग्रिटिंग कार्ड देत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अमेरिकेतील ओहायोमध्ये असलेल्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
जागतिक पातळीवरील विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य करण्यात आला. फ्रेंडशिप डेचा एकंदरीत इतिहास पाहता व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे यांसारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डेचा पायांडा पाश्चिमात्य देशांमध्ये रुजवण्यात आला. भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. यंदा १ ऑगस्ट २०२१ रोजी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे. सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डेचे महत्त्व फारच वाढल्याचे पाहायला मिळते.
आज तुमच्या आयुष्यातील खास मित्रमंडळींचा दिवस स्पेशल करण्यासाठी त्यांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॅपच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, एसएमएस, मेसेजेस, GIFs, HD Images, Wallpapers यांच्या माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करून तुमच्या मैत्रीमधील बॉन्डिग अधिक दृढ करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply