केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.
राष्ट्रकुलाच्या ‘युनेस्को’ या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रुढ झाली. ४२ वर्षांपूर्वी ‘युनेस्को’ ने सुरु केलेल्या जागतिक साक्षरता दिनाला अजूनही प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
भारतात सुद्धा या अभियानाचे चांगले फलित दिसून आले असून, एका आकडेवारीनुसार १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा साक्षरता दर हा १२ % इतकाच होता. मात्र बदलत्या काळाबरोबर आपला साक्षरता दर ७४ ते ८० % पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेत पण ही वाढ पुरेशी नाही.
युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा.
Leave a Reply