१९ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन तेवढा ठाऊक होता. पण गेल्या काही वर्षात जगभरात सेलिब्रेट केल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानेही आता जनमानसाचे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले आहे. १९९९ मध्ये ही संकल्पना अस्तित्वात आली. जगभरातील ६० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वेगाने वाढू लागले. केवळ पुरुषांचेच वर्चस्व असलेली अनेक क्षेत्रे त्यांनी काबीज केली. त्यांना त्यांच्या सार्मथ्याची जाणीव झाली आणि येथेच स्त्री-पुरुष संघर्षाची बीजे रोवली गेली.
हळूहळू स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्या् अत्याचाराच्या घटना कानावर येऊ लागल्या. ४९८ या कायद्याचा स्त्रिया ढाल म्हणून नव्हे तर तलवार म्हणून उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा हा कायदा असल्याने या कायद्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ लागला. काही स्त्रिया पती व सासरच्या लोकांविरुद्ध कुठलीही खोटी तक्रार करून त्यांना छळू लागल्या. अनेक निरपराध पुरुष व त्यांचे कुटुंबीय पोलीस आणि कायद्याच्या कचाट्यात नाहक भरडले जाऊ लागले. त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला. १९९० नंतर या कलमाचा गैरवापर होण्याच्या घटना वेगाने घडू लागल्या. याच दशकात देशभरात पुरुष हक्क संरक्षणासाठी लढणार्याै संघटना उदयाला आल्या. २००५ मध्ये बंगलोर येथे सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनची (सिफ) स्थापना झाली. इंटरनेटच्या माध्यमाने अनेक पत्नीपीडित पुरुष या संघटनेशी जुळले. आज ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. आपल्या पत्नीच्या निषेधार्थ जागतिक पुरुष दिन, फादर्स डे हे दिवस देखील संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरे केले जातात.
सिफतर्फे अखिल भारतीय सासू सुरक्षा मंच (ऑल इंडिया मदर इन ला प्रोटेक्शन फोरम) देखील ऑक्टोबर २००९ मध्ये स्थापन करण्यात आला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply