रुग्ण सेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे .रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते. १२ मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइंटिगेल यांची जयंती असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन याच दिवशी साजरा होतो.
मॉडर्न नर्सिगची सुरुवात आणि जडणघडण इस्पितळांच्या चौकटीतच झाली आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता आणि वैयक्तिक देखभाल याचा विचार केला तर नर्सिग हा सर्वात मोठा समूह आहे. रुग्णाने लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा सुश्रुषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातील परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशाने रुग्णांची दैनंदिन सुश्रुषा करत असतात.
रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना रुग्णस्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी सृजनात्मक आणि नव नव्या उपायांचा परिचारिका प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरुप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील रुग्णांची सेवा करताना परिचारिकेला ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीची जोड अनिवार्य आहे. बेसिक बी.एस्सी. नर्सिग कार्यक्रमांतर्गत अनेक संस्था परिचारिकांना ज्ञान, कौशल्य, सेवावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नर्सिग हा सेवाभावी तसेच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्यप्रती स्वत:चे योगदान देणारा व्यवसाय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply